ईश्वरपूर : हुबालवाडी येथील कुमार राजवर्धन दिलीप हुबाले, इयत्ता सातवीतील विद्यार्थी, यांनी सांगली शिक्षण संस्था सांगली यांच्यामार्फत घेण्यात येणाऱ्या शताब्दी शिष्यवृत्ती परीक्षेत महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
तसेच नुकत्याच आलेल्या स्कॉलरशिप परीक्षेच्या निकालामध्ये ही त्यांनी आदर्श बालक मंदिर हायस्कूलमध्ये दुसरा क्रमांक, सांगली जिल्ह्यात पाचवा क्रमांक तसेच राज्यात सतरावा क्रमांक पटकावला आहे. त्यांच्या या यशामुळे शाळा, कुटुंब आणि परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
राजवर्धन यांच्या या यशामागे सातत्यपूर्ण मेहनत, अभ्यासातील शिस्त आणि शिक्षकांचे तसेच आई-वडिलांचे मार्गदर्शन व साथ असल्याचे त्यांनी सांगितले . त्यांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.