स्वातंत्र्यलढ्यातील महिलांचा त्याग नव्या पिढीसाठी प्रेरणादायी: प्रभारी प्राचार्य प्रा. कृष्णा के. रानगर

👤 सतीशकुमार पडोळकर | 📅 10 August 2026 | 👁 20 Views
स्वातंत्र्यलढ्यातील महिलांचा त्याग नव्या पिढीसाठी प्रेरणादायी: प्रभारी प्राचार्य प्रा. कृष्णा के. रानगर
राजे रामराव महाविद्यालयात ‘भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील महिलांचे योगदान’ विषयावर कार्यशाळा

जत, दि. १० (प्रतिनिधी) : भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महिलांनी केलेला त्याग, संघर्ष आणि शौर्य हे देशाच्या इतिहासातील प्रेरणादायी पर्व आहे. स्वातंत्र्यसंग्रामातील महिला स्वातंत्र्यसैनिकांच्या कार्यातून विद्यार्थ्यांनी राष्ट्रप्रेम, धैर्य आणि सामाजिक बांधिलकीची प्रेरणा घ्यावी, असे प्रतिपादन राजे रामराव महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. कृष्णा के. रानगर यांनी केले.

श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या राजे रामराव महाविद्यालय, जत येथील इतिहास विभाग व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांती दिनानिमित्त ‘Contribution of Women to the Indian Freedom Movement’ (भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील महिलांचे योगदान) या विषयावर सोमवारी (दि. १० ऑगस्ट) एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयातील खोली क्रमांक ४०८ (भूगोल विभाग) येथे झालेल्या या कार्यशाळेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. कृष्णा के. रानगर होते. इतिहास विभागप्रमुख डॉ. पुंडलिक जे. चौधरी यांनी प्रास्ताविकातून कार्यशाळेचा उद्देश स्पष्ट केला. स्वातंत्र्यलढ्यात महिलांनी दिलेले योगदान, त्यांचा त्याग, संघर्ष आणि सक्रिय सहभाग विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

अध्यक्षीय मनोगतात प्र. प्राचार्य प्रा. कृष्णा के. रानगर यांनी स्वातंत्र्यलढ्यातील महिलांच्या योगदानाचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित करून विद्यार्थ्यांनी महिला स्वातंत्र्यसैनिकांच्या कार्याचा अभ्यास करून त्यांच्या त्यागातून प्रेरणा घ्यावी, असे आवाहन केले.
कार्यशाळेचे संसाधन व्यक्ती श्री. नवनाथ के. पुजारी यांनी भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील महिलांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर सविस्तर मार्गदर्शन केले. विविध महिला स्वातंत्र्यसैनिकांनी ब्रिटिश सत्तेविरोधात केलेला संघर्ष, त्याग आणि राष्ट्रकार्य यावर त्यांनी प्रकाश टाकला. संसाधन व्यक्तींचा परिचय प्रा. विशाल ए. गोडबोले यांनी करून दिला.

यावेळी कार्यशाळेचे समन्वयक प्रा. विशाल ए. गोडबोले यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील महिलांचे योगदान अत्यंत प्रेरणादायी असून, त्यांच्या कार्याची माहिती नव्या पिढीपर्यंत पोहोचणे आवश्यक असल्याचे सांगितले.

अध्यक्षीय मनोगतात प्रा. कृष्णा के. रानगर यांनी स्वातंत्र्यलढ्यातील महिलांच्या योगदानाचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित केले. विद्यार्थ्यांनी महिला स्वातंत्र्यसैनिकांच्या कार्याचा अभ्यास करून त्यांच्या त्यागातून प्रेरणा घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाचे आभार श्री. अनिल पी. लोखंडे यांनी मानले. यावेळी इंग्रजी विभागप्रमुख डॉ. रामदास बनसोडे, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. शिवाजी आर. कुलाळ, प्राध्यापक, विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. पुंडलिक जे. चौधरी, प्रा. विशाल ए. गोडबोले, श्री. अनिल पी. लोखंडे तसेच इतिहास विभाग व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षातील सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
स्वातंत्र्यलढ्यातील महिलांचा त्याग नव्या पिढीसाठी प्रेरणादायी: प्रभारी प्राचार्य प्रा. कृष्णा के. रानगर | शाळेची सुट्टी निसर्गासाठी; मणेराजूरीच्या बालचमूंकडून शेषागिरी पर्वतावर (शेकोबा डोंगर ) हरितक्रांती! | पाटगावाव ( मिरज ) खून प्रकरणातील तीन आरोपी १२ तासात पोलिसांच्या जाळ्यात | तासगावात 9ऑगस्ट क्रांतीदिन उत्साहात साजरा | हक्कांच्या संघर्षासोबत समाजविकासाची नवी वाट; ‘मेंढपाळ आर्मी’ची उल्लेखनीय वाटचाल | महेश नार्वेकर यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त कणकवलीत सफाई कामगारांना धान्य वाटप | कणकवलीत १६ ऑगस्टला सम्यक साहित्य संसदेच्या पुरस्कारांचे वितरण | 56 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी हीच अण्णासाहेबांसाठी लाख मोलाची शुभेच्छा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | " दहीहंडी पथकातील गोविंदांसाठी 10 लाखांचे विमाकवच!" | महाराष्ट्राच्या शैक्षणिक व सामाजिक परिवर्तनात डॉ. बापूजी साळुंखे यांचे योगदान महत्त्वाचे : प्रा. सी. वाय. मानेपाटील |