ज्येष्ठ शिक्षणमहर्षी डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाने मोठी पोकळी; वैभव नाईक यांच्याकडून श्रद्धांजली

👤 तुषार शिंगाडे | 📅 08 August 2026 | 👁 8 Views
ज्येष्ठ शिक्षणमहर्षी डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाने मोठी पोकळी; वैभव नाईक यांच्याकडून श्रद्धांजली

शिक्षणमहर्षी, माजी राज्यपाल तथा पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या दुःखद निधनाने शिक्षण, आरोग्य, क्रीडा, समाजकारण आणि राजकारण या विविध क्षेत्रांत मोठी पोकळी निर्माण झाली आहे, अशी भावना कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी व्यक्त केली.
डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन वैभव नाईक यांनी सांत्वन केले. यावेळी त्यांनी डॉ. पाटील यांच्या कार्याला श्रद्धांजली अर्पण केली.
डॉ. डी. वाय. पाटील यांनी शिक्षण, आरोग्य, क्रीडा, समाजकारण तसेच राजकारणाच्या माध्यमातून केलेले कार्य अत्यंत मोठे आहे. त्यांच्या निधनामुळे या सर्वच क्षेत्रांत मोठी पोकळी निर्माण झाली असून, त्यांच्या कार्याचा ठसा कायम स्मरणात राहील, असे वैभव नाईक यांनी सांगितले.
यावेळी उद्योजक प्रशांत पोळके, स्वरूप कदम, संतोष गाडगीळ, विनय चौगुले आदी उपस्थित होते.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
सहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्तांची मुळदे येथील मत्स्य संशोधन व संवर्धन प्रकल्पास भेट* | ज्येष्ठ शिक्षणमहर्षी डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाने मोठी पोकळी; वैभव नाईक यांच्याकडून श्रद्धांजली | महिला नेत्यांचा अवमान महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारा नाही; हर्षवर्धन सपकाळ यांनी जाहीर माफी मागावी – निशिकांत कडुलकर | रक्तदानातून हुतात्मा मेजर कौस्तुभ रावराणे यांना मानवंदना; स्मृतिदिनानिमित्त २० रक्तदात्यांचा सहभाग | जतच्या सार्वजनिक वाहतुकीला मोठे बळ-गोपीचंद पडळकर | महिलांच्या सुरक्षिततेसाठी कायद्यांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जनजागृती आवश्यक : सौ. दीपा चौंदीकर | पोलिसांच्या तपासातून परतला ऐवज, अन् नागरिकांच्या डोळ्यांत दाटले कृतज्ञतेचे अश्रू! चार कोटींचा मुद्देमाल हस्तांतरित | खून प्रकरणातील फरार आरोपी लखन इसरडे एलसीबीच्या जाळ्यात; मिरजेत सापळा रचून अटक | शिवसेना नगरसेवक ६ वर्षांसाठी अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय | आटपाडीत अवैध शस्त्रांचा मोठा साठा जप्त; चार सराईत गुन्हेगार अटकेत |