खून प्रकरणातील फरार आरोपी लखन इसरडे एलसीबीच्या जाळ्यात; मिरजेत सापळा रचून अटक

👤 संतोष एडके तासगाव | 📅 07 August 2026 | 👁 204 Views
खून प्रकरणातील फरार आरोपी लखन इसरडे एलसीबीच्या जाळ्यात; मिरजेत सापळा रचून अटक

खूनासह गंभीर स्वरूपाच्या विविध गुन्ह्यांत निष्पन्न झालेला व पोलिसांच्या नजरेआड असलेला फरार आरोपी लखन पंडीत इसरडे (वय 35, रा. टिंबर एरिया, नवीन वसाहत, सांगली) याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने मिरज येथील म्हैशाळ रोड टोलनाक्याजवळ सापळा रचून ताब्यात घेतले.
सांगली शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हा क्रमांक 290/2026 मध्ये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 103(1), 189(2), 190, 191(2), 191(3), 115(2), 351(2), 351(3) तसेच आर्म्स ॲक्ट कलम 4, 25 अन्वये गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात लखन इसरडे हा निष्पन्न आरोपी असून तो फरार होता.
दरम्यान, लखन इसरडे हा म्हैशाळ रोड टोलनाका, मिरज येथे येणार असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलीस फौजदार सुभाष सूर्यवंशी व पोलीस हवालदार संदीप नलावडे यांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या आदेशानुसार सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत निशानदार, पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील, सहाय्यक पोलीस फौजदार सुभाष सूर्यवंशी, पोलीस हवालदार मुळे विनायक सुतार , होळकर यांच्या पथकाने कारवाईचे नियोजन केले.
पथकाने म्हैशाळ रोड, मिरज परिसरात सापळा रचून लखन इसरडे याला ताब्यात घेतले. त्यानंतर पुढील तपासासाठी त्याला सांगली शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
रक्तदानातून हुतात्मा मेजर कौस्तुभ रावराणे यांना मानवंदना; स्मृतिदिनानिमित्त २० रक्तदात्यांचा सहभाग | जतच्या सार्वजनिक वाहतुकीला मोठे बळ-गोपीचंद पडळकर | महिलांच्या सुरक्षिततेसाठी कायद्यांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जनजागृती आवश्यक : सौ. दीपा चौंदीकर | पोलिसांच्या तपासातून परतला ऐवज, अन् नागरिकांच्या डोळ्यांत दाटले कृतज्ञतेचे अश्रू! चार कोटींचा मुद्देमाल हस्तांतरित | खून प्रकरणातील फरार आरोपी लखन इसरडे एलसीबीच्या जाळ्यात; मिरजेत सापळा रचून अटक | शिवसेना नगरसेवक ६ वर्षांसाठी अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय | आटपाडीत अवैध शस्त्रांचा मोठा साठा जप्त; चार सराईत गुन्हेगार अटकेत | आटपाडीत अवैध शस्त्रांचा मोठा साठा जप्त; चार सराईत गुन्हेगार अटकेत | गटशेती ही सामाजिक चळवळ व्हायला हवी : डॉ. अविनाश पोळ | बचतगटांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण --दिपक सुर्वे |