बाबू खरात यांची सभापती सिद्धेश (बंटी)रावराणे यांनी घेतली भेट

👤 तुषार शिंगाडे सिंधुदुर्ग | 📅 06 August 2026 | 👁 1 Views
बाबू खरात यांची सभापती सिद्धेश (बंटी)रावराणे यांनी घेतली भेट
आचिर्णेत विद्युत वाहिनीचा धक्क्यात झाले होते गंभीर जखमी; नुकसान भरपाईसाठी पाठपुराव्याची ग्वाही
आचिर्णे येथे तुटलेल्या विद्युतवाहिनीचा धक्का लागून गंभीर जखमी झालेल्या पशुपालक बाबू शामू खरात यांची सभापती सिद्धेश रावराणे व आचिर्णेचे माजी सरपंच रुपेश रावराणे यांनी जिल्हा रुग्णालयात जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांनी श्री खरात यांच्या प्रकृतीची विचारपूस करून त्यांना धीर दिला.

बुधवारी दुपारी विद्युत भारीत तुटलेल्या वाहिनीचा धक्का लागून बाबू खरात गंभीर जखमी झाले होते. तसेच त्यांच्या दोन शेळ्यांचा मृत्यू, तर काही शेळ्या जखमी झाल्या होत्या. या घटनेमुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या दुर्घटनेनंतर श्री खरात यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. सभापती श्री रावराणे यांनी बुधवारी रात्री रुग्णालयात जाऊन श्री खरात यांची भेट घेतली. त्यांच्या तब्येतीची विचारपूस करून त्यांना धीर दिला. तसेच संबंधित शासकीय यंत्रणेकडे पाठपुरावा करून नुकसान झालेल्या शेळ्यांची नुकसानभरपाई लवकरात लवकर मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
गटशेती ही सामाजिक चळवळ व्हायला हवी : डॉ. अविनाश पोळ | बचतगटांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण --दिपक सुर्वे | बाबू खरात यांची सभापती सिद्धेश (बंटी)रावराणे यांनी घेतली भेट | विद्यार्थ्यांच्या ‘रानभाज्या बाजाराला’ ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद | हरित संस्कारातून घडणार विकसित भारताची पिढी | आकांक्षीत तालुका निती आयोगाच्या डेल्टा रेकिंग मध्ये अक्कलकोट तालुक्याची गरुड झेप राज्यात तिसरा क्रमांक | ईश्वरपूरमध्ये पाण्याच्या मीटरची धडाधड चोरी! 4-5 दिवसात मोठा प्रकार, नागरिक त्रस्त | महात्मा फुले योजनेतील 15,407 संशयास्पद दाव्यांची SIT चौकशी होणार ! | पर्ल्स (PACL) गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाचे अपडेट | कागदी रेशनकार्ड 15 ऑगस्टपासून बंद! |