गुरुकुल'मध्ये रंगला मातृ-पितृ कृतज्ञता सोहळा; विद्यार्थ्यांकडून जन्मदात्यांचे पाद्यपूजन, उपस्थितांचे पाणावले डोळे!

👤 तुषार शिंगाडे सिंधुदुर्ग | 📅 02 August 2026 | 👁 11 Views
गुरुकुल'मध्ये रंगला मातृ-पितृ कृतज्ञता सोहळा; विद्यार्थ्यांकडून जन्मदात्यांचे पाद्यपूजन, उपस्थितांचे पाणावले डोळे!
गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून 'गुरुकुल'चा अनोखा उपक्रम; जिल्ह्यात अशा प्रकारचा पहिलाच उपक्रम ठरल्याची चर्चा
गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून 'गुरुकुल'मध्ये विद्यार्थ्यांचे पहिले गुरु असणाऱ्या जन्मदात्या आई-वडिलांच्या पूजनाचा 'मातृ-पितृ कृतज्ञता सोहळा' नुकताच मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात पार पडला. संपूर्ण जिल्ह्यात प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या या आगळ्यावेगळ्या आणि संस्कारक्षम सोहळ्याने उपस्थित सर्वांचीच मने जिंकली.
जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून या सोहळ्यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांनी मोठी उपस्थिती लावली होती. कार्यक्रमाची सुरुवात ईशस्तवन आणि सुमधुर स्वागतगीताने झाली. त्यानंतर महर्षी व्यासांच्या प्रतिमेचे पूजन आणि सामूहिक प्रार्थना करण्यात आली. यानंतर खऱ्या अर्थाने या सोहळ्यातील सर्वात भावनिक प्रसंगाला सुरुवात झाली. सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या जन्मदात्या आई-वडिलांचे पाय धुऊन, गंधाक्षता लावून त्यांचे विधीवत पूजन केले आणि आरती ओवाळली. आजच्या धकाधकीच्या काळात आपल्या पाल्यांच्या हाताने होत असलेले हे भावपूर्ण पूजन पाहून अनेक पालक, विद्यार्थी आणि शिक्षकांचेही डोळे पाणावले. संपूर्ण वातावरण काही काळ गहिवरून गेले होते.
या हृदयस्पर्शी प्रसंगानंतर, 'गुरुकुल'च्या वतीने सर्व विद्यार्थ्यांनी आई-वडील आणि गुरुजनांशी कायम एकनिष्ठ राहण्याची, त्यांचा आदर करण्याची प्रतिज्ञा आपल्या पालकांच्या साक्षीने घेतली. त्यानंतर सामूहिक प्रार्थना आणि पसायदानाने संपूर्ण वातावरणात भक्तीचा रंग भरला गेला. याप्रसंगी अनेक विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि पालकांनी अत्यंत भावूक होत आपली मनोगते व्यक्त केली व गुरुकुलच्या या संस्कारक्षम उपक्रमाचे भरभरून कौतुक केले.
या अनोख्या कार्यक्रमाला गुरुकुलच्या संचालिका सौ. श्रद्धाताई ढोणुकसे, प्रा. सुनील ढोणुकसे आणि क्रीडा प्रशिक्षक संकेत कदम त्याचबरोबर बहुसंख्येने विद्यार्थी व पालक उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विद्यार्थी व शिक्षक यांनी उत्कृष्ट नियोजन केले होते. या संपूर्ण कार्यक्रमाचे प्रास्ताविक, उत्कृष्ट सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन प्रा. बी. एस. जांभेकर यांनी पार पाडले. सर्वांच्या उपस्थितीत पार पडलेल्या सहभोजनाने या अविस्मरणीय कार्यक्रमाची सांगता झाली.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |