तासगाव बायपासला बाधितांचा तीव्र विरोध; 'शहरालगतचा मार्ग रद्द करा, अन्यथा कायदेशीर लढा'

👤 संतोष एडके तासगाव | 📅 02 August 2026 | 👁 503 Views
तासगाव बायपासला बाधितांचा तीव्र विरोध; 'शहरालगतचा मार्ग रद्द करा, अन्यथा कायदेशीर लढा'

तासगाव : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६० वरील प्रस्तावित तासगाव बायपास शहरालगतून नेण्याच्या निर्णयाला बाधित नागरिकांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. शहरालगतून जाणाऱ्या प्रस्तावित मार्गामुळे घरे, व्यावसायिक आस्थापने, बिनशेती व नियमितीकरण केलेले प्लॉट तसेच शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे हा मार्ग तातडीने रद्द करून बायपास शहरापासून किमान तीन ते चार किलोमीटर अंतरावरून नेण्यात यावा, अन्यथा कायदेशीर लढा उभारण्याचा इशारा बाधित नागरिकांनी दिला आहे.
या पार्श्वभूमीवर गुरुवारी (दि. ३१ जुलै) पुनदी रोड येथील हॉलमध्ये शेकडो बाधित नागरिकांची बैठक झाली. बैठकीत "शहरालगतचा बायपास नकोच" अशी एकमुखी भूमिका घेण्यात आली. राष्ट्रीय महामार्ग असल्याने रस्त्याची रुंदी अधिक राहणार असून, भूसंपादनामुळे मोठ्या संख्येने नागरिकांना फटका बसण्याची भीती व्यक्त करण्यात आली.
शहराच्या विकासासाठी बायपास आवश्यक असल्याचे मान्य करतानाच, त्यासाठी नागरिकांची घरे, दुकाने आणि शेती उद्ध्वस्त करणे योग्य नसल्याचे मत उपस्थितांनी मांडले. इतर शहरांप्रमाणे तासगावचाही बायपास शहरापासून सुरक्षित अंतरावरून नेण्यात यावा, अशी मागणी बैठकीत करण्यात आली.
याबाबत जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी तसेच संबंधित शासकीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रस्तावित मार्गाचा फेरविचार करून पर्यायी मार्ग निश्चित करण्यासाठी शासन आणि प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात येणार असून, मागणी मान्य न झाल्यास न्यायालयीन आणि कायदेशीर मार्गाने तीव्र लढा उभारण्याचा निर्धार बाधित नागरिकांनी व्यक्त केला.
बैठकीत उपस्थित नागरिकांनी बायपासच्या नावाखाली नागरिकांचे संसार, व्यवसाय आणि शेती उद्ध्वस्त होऊ देणार नाही, अशी ठाम भूमिका घेतली. त्यामुळे तासगाव बायपासच्या प्रश्नावर बाधित नागरिक आणि प्रशासन यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |