तुळजाभवानी इंग्लिश मेडियम स्कूलचा शिष्यवृत्ती परिक्षेत दैदीप्यमान यश

👤 अतुल सोनकांबळे इंदापूर | 📅 30 July 2026 | 👁 46 Views
तुळजाभवानी इंग्लिश मेडियम स्कूलचा शिष्यवृत्ती परिक्षेत दैदीप्यमान यश
निमगाव केतकीच्या 12 विद्यार्थ्यांची राज्य शिष्यवृत्ती परिक्षेत बाजी; शाळा, गावाचे नाव उज्ज्वल
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा 2025-26 मध्ये तुळजाभवानी इंग्लिश मेडियम स्कूल, निमगाव केतकी या शाळेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले आहे. शाळेतील एकूण 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत.

शाळेच्या या दैदीप्यमान यशामुळे संपूर्ण निमगाव केतकी गावासह इंदापूर तालुक्याचे नाव उज्ज्वल झाले आहे.

पात्र विद्यार्थ्यां अवधूत भारत नलवडे,श्रुतिका गणेश आदलिंग,सृष्टी महादेव पागळे,कार्तिकी महेश गायकवाड,सायली राहुल नलवडे, स्वरा महादेव पागळे, अनन्या विश्वजीत कांबळे,कल्याणी कुंडलिक कचरे,श्रेया शिवाजी निकम,रुद्र महेश गायकवाड,शिवम अंबुदास जाधव, श्री सिद्धेश्वर माने यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन केले.

ग्रामीण भागातील शाळेने शहरी भागाच्या शाळांनाही मागे टाकत हे यश मिळवले आहे. शाळेचे प्राचार्य, शिक्षक आणि पालकांच्या अथक परिश्रमामुळे विद्यार्थ्यांना हे यश मिळवता आले. शाळेत दररोज अतिरिक्त तास घेऊन, सराव चाचण्या, मार्गदर्शन शिबिरे घेऊन विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी तयार करण्यात आले होते.

शाळेचे मुख्याध्यापक संदीप तनपुरे सर यांनी सांगितले की, "आमचे उद्दिष्ट केवळ शिष्यवृत्ती मिळवणे नव्हे तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणे आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थीही जिद्द आणि चिकाटीच्या बळावर मोठे यश मिळवू शकतात हे आमच्या विद्यार्थ्यांनी दाखवून दिले आहे."


शाळेच्या या यशाबद्दल गावातील नागरिक, पालक आणि लोकप्रतिनिधींनी समाधान व्यक्त केले आहे. शाळेचे नाव आणि गावाचे नाव राज्यस्तरावर उज्ज्वल केल्याबद्दल सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

शाळेच्या वतीने सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले. तसेच "तुमच्या या यशाचा आम्हा सर्वांना सार्थ अभिमान आहे. तुम्हा सर्वांना पुढील यशस्वी वाटचालीसाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा" असे गौरवोद्गार काढण्यात आले.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
शुभांगीताई गावडे यांनी शिक्षणासोबत संस्कारांची जोपासना केली; त्यांचा आदर्श प्रत्येकाने अंगीकारावा– प्रा. के. के. रानगर | तुळजाभवानी इंग्लिश मेडियम स्कूलचा शिष्यवृत्ती परिक्षेत दैदीप्यमान यश | ईश्वरपूर नगराध्यक्ष प्रकरणात मोठा दिलासा; आनंदराव मलगुंडेंच्या अपात्रतेच्या आदेशाला शासनाची स्थगिती | कवठेमहांकाळच्या आरोग्य सेवेला नवी दिशा; 100 बेड रुग्णालयासाठी आमदार गोपीचंद पडळकरांच्या पाठपुराव्याला पंचायत समितीची सलामी | रामगड किल्ल्यावर दुर्गवीर प्रतिष्ठान सिंधुदुर्गची श्रमदान मोहिम | पैजारवाडी येथे सद्गुरु चिले महाराजांची गुरुपौर्णिमा उत्साहात; धार्मिक कार्यक्रमांना भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद | शिरगाव माजी सरपंच हत्या प्रकरणाला नवे वळण; अनैतिक संबंध नव्हे, आर्थिक वादातून खून झाल्याची चर्चा | मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षेतील २८० गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव... | स्पर्धेत टिकण्यासाठी शासकीय नियमांची काटेकोर पालन करणे आवश्यक --राजू जठार | आषाढी एकादशी निमित्त संकलन केलेल्या कपड्यांचे सविता आश्रम पणदुर येथे केले दान |