सांगली ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई : सांडपाणी योजनेवरील साहित्य चोरी करणारी टोळी जेरबंद; ₹६९ हजारांचा मुद्देमाल जप्त

👤 कवठेमहांकाळ जगन्नाथ सकट | 📅 29 July 2026 | 👁 45 Views
सांगली ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई : सांडपाणी योजनेवरील साहित्य चोरी करणारी टोळी जेरबंद; ₹६९ हजारांचा मुद्देमाल जप्त
सांगली ग्रामीण पोलिसांनी जुनी धामणी (ता. मिरज) येथील शासकीय सांडपाणी व्यवस्थापन योजनेवरील साहित्य चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत दोन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत चोरीस गेलेले सुमारे ₹६९ हजार किमतीचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

याप्रकरणी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २१५/२०२६ भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रांजल संजय घावळकर यांनी याबाबत फिर्याद दिली होती. या गुन्ह्याचा तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल अभिजित पाटील यांच्याकडे सोपविण्यात आला होता.

पोलीस अधीक्षक तुषार दोषी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारावकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अभिजित देशमुख यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरू केला. तपासादरम्यान आरोपी चोरीचा माल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपींनी चोरीची कबुली दिली.

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये अक्षय अनिल चव्हाण (वय ३०) व अनिल मारुती कोळी (वय ४२, दोघेही रा. ग्रामपंचायतीजवळ, जुनी धामणी, ता. मिरज) यांचा समावेश आहे.

कारवाईदरम्यान पोलिसांनी एक हिलमन मोटारसायकल, पाणी उपसा करणारा पंप, दोन फोल्डिंग पाईप आणि लोखंडी साखळीचे बंडल असा एकूण ₹६९ हजार किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल अभिजित पाटील करीत आहेत.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
१२ वर्षे... आश्वासन अधुरेच’; धनगर समाजाचा ‘विश्वासघात दिन’ साजरा, काळ्या पट्ट्या बांधून सरकारविरोधात तीव्र निषेध | सांगली ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई : सांडपाणी योजनेवरील साहित्य चोरी करणारी टोळी जेरबंद; ₹६९ हजारांचा मुद्देमाल जप्त | बीड दौऱ्यावर ना. पंकजाताई मुंडे; जिल्हा नियोजन समिती बैठकीसह जनसंपर्क व विविध कार्यक्रमांना उपस्थिती | संवाद,संस्कार आणि शिक्षणाचे नाते जपा – साहित्यिक अजय कांडर | स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त कृषी महाविद्यालय सांगुळवाडी वैभववाडी येथे वृक्षारोपण | सागरमाला २.० अंतर्गत महाराष्ट्रातील प्रकल्पांना मंजुरी मिळण्यासाठी मंत्री नितेश राणे यांचा केंद्राकडे पाठपुरावा | सेवानिवृतानी बचत खाते पेन्शन खात्यात बदलून सी.पी.पी. योजनेचा लाभ घ्यावा | सोलापूर जि. प. मा.सदस्य अंबादासभाऊ पाटील यांचे दुःखद निधन | रक्षकच बनला भक्षक! जमीन नसताना सचिवाने स्वतःच्याच नावावर पीककर्ज; कर्जमाफीतही नाव, शेतकऱ्यांत संताप | पत्रकारितेच्या सक्षमीकरणाचा निर्धार; व्हॉईस ऑफ मीडिया च्या दिल्लीमधील राष्ट्रीय अधिवेशनाची उत्साहात सांगता |