संवाद,संस्कार आणि शिक्षणाचे नाते जपा – साहित्यिक अजय कांडर

👤 तुषार शिंगाडे सिंधुदुर्ग | 📅 29 July 2026 | 👁 1 Views
संवाद,संस्कार आणि शिक्षणाचे नाते जपा – साहित्यिक अजय कांडर
"संवाद हरवल्यास भाषा संपते, भाषा संपल्यास शिक्षण संपते, शिक्षण संपल्यास संस्कृती संपते आणि संस्कृती संपल्यास देश संपतो. त्यामुळे बोलीभाषेतून सुसंवाद साधत संवादाची परंपरा जपणे ही काळाची गरज आहे. शिक्षण म्हणजे केवळ पाठ्यपुस्तकांतील ज्ञान नव्हे, तर मुलांमधील सुप्त कला, सर्जनशीलता आणि संस्कारांचा सर्वांगीण विकास होय," असे प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक अजय कांडर यांनी केले.
धी आचरा पीपल्स असोसिएशन, मुंबई संचलित न्यू इंग्लिश School व कनिष्ठ महाविद्यालय, आचरा येथे आयोजित आदर्श विद्यार्थी-विद्यार्थिनी सत्कार समारंभ, आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण व गुणवंत विद्यार्थ्यांच्या पारितोषिक वितरण सोहळ्यात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. यावेळी मुंबई कमिटीचे अध्यक्ष प्रदीप मिराशी ,कार्याध्यक्ष प्रदिप परब मिराशी, इकबाल काझी (उपकार्याध्यक्ष, मुंबई कमिटी), ॲड. सुभाष आचरेकर (सचिव), मंगेश आचरेकर (कोषाध्यक्ष), जे एम फर्नांडिस ,निलेश सरजोशी , संजय मिराशी ,वरिष्ठ महाविद्यालय), रघुनाथ पाटील, बाबाजी भिसळे, अजित आचरेकर, पोलीस उपनिरीक्षक तुकाराम पडवळ, प्राचार्य नितेश सारंग, सुरेश ठाकूर, अशोक कांबळी तसेच शिक्षक, पालक, विद्यार्थी आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी विविध शाखांतील आदर्श विद्यार्थी-विद्यार्थिनी पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. न्यू इंग्लिश स्कूल, आचरा येथून रुद्र संजय जाधव व सई अंकुशराव घुटुकडे, नामदेव शंकर कावळे इंग्लिश मीडियम येथून तेजस विश्वास पेडणेकर व रंजिता राजेंद्रप्रसाद नाडकर्णी, कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय येथून प्रथमेश राजेंद्र पुजारे व कस्तुरी नितीन परुळेकर, तर बी.एम.एस. व कॉमर्स वरिष्ठ महाविद्यालय येथून भूषण निलेश नाईक व दर्शना सुनील परब यांना आदर्श विद्यार्थी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.न्यू इंग्लिश स्कूलच्या उपमुख्याध्यापिका मधुरा महेश माणगावकर यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रशालेचे माजी विद्यार्थी तुकाराम पडवळ यांची पोलीस उपनिरीक्षकपदी पदोन्नती झाल्याबद्दल त्यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. सन २०२५–२६ मधील इयत्ता दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांनाही पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक अंकुशराव घुटुकडे यांनी केले. यावेळी बोलताना
मुंबई कमिटीचे कार्याध्यक्ष प्रदीप परब मिराशी यांनी संस्थेची दैदीप्यमान परंपरा व भावी ध्येयधोरणे मांडली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनघा कदम यांनी केले, तर आभार इंग्लिश मीडियमच्या मुख्याध्यापिका मायलीन फर्नांडिस यांनी मानले.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
बीड दौऱ्यावर ना. पंकजाताई मुंडे; जिल्हा नियोजन समिती बैठकीसह जनसंपर्क व विविध कार्यक्रमांना उपस्थिती | संवाद,संस्कार आणि शिक्षणाचे नाते जपा – साहित्यिक अजय कांडर | स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त कृषी महाविद्यालय सांगुळवाडी वैभववाडी येथे वृक्षारोपण | सागरमाला २.० अंतर्गत महाराष्ट्रातील प्रकल्पांना मंजुरी मिळण्यासाठी मंत्री नितेश राणे यांचा केंद्राकडे पाठपुरावा | सेवानिवृतानी बचत खाते पेन्शन खात्यात बदलून सी.पी.पी. योजनेचा लाभ घ्यावा | सोलापूर जि. प. मा.सदस्य अंबादासभाऊ पाटील यांचे दुःखद निधन | रक्षकच बनला भक्षक! जमीन नसताना सचिवाने स्वतःच्याच नावावर पीककर्ज; कर्जमाफीतही नाव, शेतकऱ्यांत संताप | पत्रकारितेच्या सक्षमीकरणाचा निर्धार; व्हॉईस ऑफ मीडिया च्या दिल्लीमधील राष्ट्रीय अधिवेशनाची उत्साहात सांगता | पिंपरी-चिंचवडसाठी स्वतंत्र टपाल विभागाची मागणी; खासदार श्रीरंग बारणे यांनी केंद्र सरकारकडे मांडली भूमिका | नदीकाठ सावधान, कोयना धरणातून 1000 कुसेक पाण्याचा विसर्ग |