सोलापूरच्या शासकीय हॉटेल मॅनेजमेंट कॉलेजमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू; १२ वी नंतर उज्ज्वल करिअरची सुवर्णसंधी

👤 अतुल फसाले | 📅 29 July 2026 | 👁 4 Views


महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन संचालनालयाद्वारे संचालित ‘श्री स्वामी समर्थ महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड कॅटरिंग तंत्रज्ञान, सोलापूर’ येथे चालू शैक्षणिक वर्षासाठी विविध अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. NCHMCT, नवी दिल्ली संलग्न असलेल्या या शासकीय महाविद्यालयात १० वी आणि १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रात उज्ज्वल भविष्य घडवण्याची उत्तम संधी उपलब्ध झाली आहे.

विविध अभ्यासक्रम उपलब्ध
विद्यार्थ्यांसाठी पदवी, डिप्लोमा आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात आले आहेत:
पदवी अभ्यासक्रम
B.Sc. in Hospitality & Hotel Administration (B.Sc. HHA) - *(१२ वी उत्तीर्ण)
डिप्लोमा अभ्यासक्रम
Diploma in Food Production - (१२ वी उत्तीर्ण)
Diploma in Hotel Operations (MSBSVET) -(१० वी उत्तीर्ण)
प्रमाणपत्र अभ्यासक्रम (Certificate Courses)
Certificate Course in Food & Beverage Service - (१० वी उत्तीर्ण)
Certificate Course in Bakery & Confectionery - (१० वी उत्तीर्ण)
Skill India अंतर्गत मोफत कौशल्य प्रशिक्षण
FREE Skill India Course – Bakery & Pastry Commis
महाविद्यालयाची वैशिष्ट्ये व सुविधा
१००% प्रॅक्टिकल आधारित शिक्षण
आधुनिक ट्रेनिंग किचन, बेकरी व रेस्टॉरंट लॅबची सुविधा.
अनुभवी प्राध्यापक व मार्गदर्शन - क्षेत्रातील तज्ज्ञांकडून थेट मार्गदर्शन.
इंटर्नशिप व प्लेसमेंट - भारतातील नामांकित हॉटेल्समध्ये इंटर्नशिप व १००% प्लेसमेंट सहाय्य.
वसतिगृह सुविधा - मुला-मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृहाची सोय.

व्यक्तिमत्त्व विकास - संवाद कौशल्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर करिअरच्या संधी.
या क्षेत्रातील करिअरच्या संधी
हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना फाइव्ह स्टार हॉटेल्स, क्रूझ लाईन्स ,एअरलाईन्स , रिसॉर्ट्स, कॅटरिंग कंपन्या, बेकरी व कॅफे यामध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. तसेच स्वतःचा व्यवसाय (Entrepreneurship) सुरू करण्यासाठीही हे प्रशिक्षण अत्यंत उपयुक्त ठरते.

प्रवेश मर्यादित जागांवर
‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर दिले जाणार आहेत.

संपर्क आणि पत्ता
पत्ता - ए-१६०, कंबर तलावाजवळ, विजापूर रोड, धर्मवीर संभाजी महाराज उद्यानाजवळ, सोलापूर – ४१३००४, महाराष्ट्र.
फोन नंबर - 9767257021 / 9379403435
ई-मेल - info.ihmsolapur@gmail.com
वेबसाइट -https://ssmihm.maharashtratourism.gov.in/
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
सामाजिक बांधिलकीचा आदर्श! स्वखर्चाने शाळा परिसर स्वच्छ; वायंगणी हायस्कूलला मिळाले सुरक्षित, सुंदर रूप | पंढरीच्या वारीत 'मुक्या' जीवांची अनोखी विठ्ठल सेवा | सोलापूर विद्यापीठात १५० कंत्राटी पदांची भरती; नव्या निविदेची प्रक्रिया सुरू | सोलापूरच्या शासकीय हॉटेल मॅनेजमेंट कॉलेजमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू; १२ वी नंतर उज्ज्वल करिअरची सुवर्णसंधी | कारगिल विजय दिवसाच्या २७ व्या वर्धापन दिनानिमित्त सोलापुरात कारगिल शहीदांना सैनिकांच्या शिस्तबद्ध शैलीत मानवंदना | ठेकेदारांना अभय, नागरिकांना त्रास' | पीक विम्यात देवगडच्या शेतकऱ्यांवर अन्याय; कृषी अधिकाऱ्यांना सभागृहात धारेवर | वाहून गेलेल्या शेतकऱ्याचा तब्बल आठ तासाने मिळाला मृतदेह..... | पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने करुळ येथील शेतकरी बेपत्ता | ओटभरणी समारंभात रुजवले संस्कारांचे बीज! |