कवठेमहांकाळ वकील संघटनेचा एल्गार,बांधकाम विभागा विरोधात उपोषण

👤 विद्याधर लोंढे कवठेमंकाळ | 📅 28 July 2026 | 👁 118 Views
कवठेमहांकाळ वकील संघटनेचा एल्गार,बांधकाम विभागा विरोधात उपोषण
कवठे महांकाळ येथे अतिरिक्त जिल्हा न्यायालय व दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर सुरू करणेबाबत उच्च न्यायालय,मुंबई यांचे मंजुरीचे पत्र मिळून जवळपास एक वर्षाचा कालावधी लोटला आहे.या विषया संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी कुचराई व दिरंगाई करत असल्याने कवठे महांकाळ वकील संघटनेकडून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात मंगळवार दिनांक २८ जुलै रोजी उपोषणाचे हत्यार उपसण्यात आले.कवठे महांकाळ वकील संघटनेच्या वतीने न्यायालयापासून तहसील कार्यालयापर्यंत निषेध फेरी काढून तहसील कार्यालय परिसरात साखळी उपोषणास सुरुवात करण्यात आली.
कवठे महांकाळ येथे अतिरिक्त जिल्हा न्यायालय आणि दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तरचे कामकाज सुरू झाल्यास न्यायव्यवस्था अधिक लोकाभिमुख होण्यास मदत होणार आहे.अशी परिस्थिती असताना कवठे महांकाळ येथे मंजूर झालेल्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय तसेच दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर यांच्या बांधकामास मंजूर आराखडा प्रमाणे नकाशा व अंदाजपत्रके त्वरित तयार करून देण्यास सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी टाळाटाळ करत असल्याने तसेच माहिती मागितली असता उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने वकील संघटनेकडून बांधकाम विभागाचा निषेध करण्यासाठी तसेच अतिरिक्त जिल्हा न्यायालय आणि दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तरचे कामकाज कवठे महांकाळ तालुका न्यायालयात त्वरित सुरू व्हावे यासाठी हे उपोषण करण्यात आले.
संपूर्ण तालुक्याच्या स्वाभिमानाचा आणि न्यायासाठीच्या हक्काचा असलेल्या या लढ्याला कवठे महांकाळ तालुक्यातील सर्वच पक्षाचे तसेच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून पाठिंबा मिळाला.हा केवळ प्रशासनाचा हलगर्जीपणा नसून तालुक्यातील लाखो नागरिकांच्या न्यायहक्कावर घातलेला घाला आहे असे मत उपस्थितांकडून व्यक्त करण्यात आले.बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता आर.एस.जाधव यांनी १० ऑगस्ट पर्यंत वकील संघटनेच्या मागणी प्रमाणे उच्च न्यायालयाकडे तत्काळ पूर्तता करण्याची लेखी हमी दिल्यानंतर हे उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे.यावेळी वकील संघटनेचे अध्यक्ष रमाकांत पाटील,उपाध्यक्षा विद्या पाटील,संघटनेचे ज्येष्ठ सभासद,इतर सभासद आणि महिला सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |