महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार गोपीचंद पडळकर व डॉ. रविंद्र आरळी यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी, जत शहर, जत पश्चिम मंडल, जत पूर्व मंडल व जत मध्य मंडल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित "सेवा परमो धर्म – महा रक्तदान संकल्प" या भव्य रक्तदान शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
"रक्तदान हेच श्रेष्ठ दान" या सामाजिक भावनेतून आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात जत शहर, जत पश्चिम, जत पूर्व व जत मध्य मंडलातील पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक, महिला भगिनी तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत रक्तदान केले. ३७२ रक्तदात्यांचे संकलन करण्यात आले.
यावेळी उपस्थितांनी रक्तदानाचे सामाजिक महत्त्व अधोरेखित करत, "आपल्या एका रक्तदानामुळे अनेक गरजू रुग्णांना नवजीवन मिळू शकते" हा संदेश जनतेपर्यंत पोहोचवला.या रक्तदान शिबिरास मा. आमदार गोपीचंद पडळकर, डॉ. रविंद्र आरळी, आण्णा भिसे, रमेश देवर्षी, सोमानिंग बोरामणी, मिलिंद पाटील यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व रक्तदाते, स्वयंसेवक, वैद्यकीय पथक, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांचे आयोजकांच्या वतीने मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.