वारणा धरणात २८.८९ टी.एम.सी. पाणीसाठा; कोयने, अलमट्टीसह प्रमुख धरणांतील विसर्ग सुरू

👤 संतोष एडके तासगाव | 📅 28 July 2026 | 👁 173 Views
वारणा धरणात २८.८९ टी.एम.सी. पाणीसाठा; कोयने, अलमट्टीसह प्रमुख धरणांतील विसर्ग सुरू

जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी ८ वाजेपर्यंत २८.८९ टी.एम.सी. पाणीसाठा असून, या धरणाची साठवण क्षमता ३४.४० टी.एम.सी. इतकी असल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली आहे.
​विविध धरणातील पाणीसाठा व साठवण क्षमता कंसात टी.एम.सी. प्रमाणात पुढीलप्रमाणे : कोयना ८०.०९ (१०५.२५), धोम ११.१९ (१३.५०), कन्हेर ९.२४ (१०.१०), धोमबलकवडी ३.५६ (४.०८), उरमोडी ८.६० (९.९७), तारळी ४.७३ (५.८५), वारणा २८.८९ (३४.४०), राधानगरी ७.७६ (८.३६), दूधगंगा १४.२८ (२५.४०), तुळशी २.६४ (३.४७), कासारी २.२० (२.७७), पाटगांव २.४० (३.७२), अलमट्टी ११७.८८ (१२३).
​सांडवा, कालवा व विद्युतगृहाव्दारे विविध धरणातून सुरू असलेला विसर्ग क्युसेकमध्ये पुढीलप्रमाणे आहे : कण्हेर धरणातून ३६५७, धोम बलकवडी ९६१, उरमोडी १०००, तारळी २०५, वारणा ३४००, राधानगरी १४०० व अलमट्टी धरणातून २० हजार क्युसेक विसर्ग सुरू आहे.
​विविध पुलांच्या ठिकाणी पाण्याची आजची पातळी व कंसात इशारा पातळी फूटामध्ये पुढीलप्रमाणे नोंदवली गेली : आयर्विन पूल सांगली ११.९ (४०) व अंकली पूल हरिपूर १७.२ (४५.११).
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |