गुरुपौर्णिमेनिमित्त मायणीच्या मातोश्री सरुताई मठात उद्या विविध कार्यक्रमाचे आयोजन.

👤 स्वप्निल कांबळे मायणी | 📅 28 July 2026 | 👁 1 Views
गुरुपौर्णिमेनिमित्त मायणीच्या मातोश्री सरुताई मठात उद्या  विविध कार्यक्रमाचे आयोजन.
मायणी ता. खटाव येथील श्री संत सद्गुरू सरुताई माऊली यांच्या मठामध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त बुधवार दि. २९ रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती ट्रस्टचे सचिव रविंद्रशेठ बाबर यांनी दिली .
या दिवशी पहाटे पाच वाजता अभिषेक ,सकाळी सहा वाजता नामस्मरण, सकाळी सात आरती, सकाळी नऊ आरती व नामस्मरण, सकाळी दहा ते अकरा तीस ह.भ. प.मनोहर महाराज पवार यांचे सुश्राव्य कीर्तन, दुपारी बारा वाजता माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर व सौ उर्मिला येळगावकर यांच्या शुभहस्ते माऊलींची महारती होणार असून दुपारपासून सायंकाळपर्यंत महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. या निमित्ताने दुपारी बारा तीस ते पाच या वेळेत श्री हनुमान भजनी मंडळ मायणी, वाल्मिकी एकतारी भजनी मंडळ, भादोले, अंजनी भजनी मंडळ, मोराळे व कानकात्रे भजनी मंडळ यांच्या सुश्राव्य भजनांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या सर्व कार्यक्रमाचा लाभ भाविकांनी घ्यावा असे आवाहन ट्रस्टमार्फत करण्यात आले आहे.

Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
गुरुपौर्णिमेनिमित्त मायणीच्या मातोश्री सरुताई मठात उद्या विविध कार्यक्रमाचे आयोजन. | महाराष्ट्र जन गौरव पुरस्कार २०२६ ने ज्येष्ठ शिक्षिका सौ. नाथलीन पावलू फर्नांडिस यांचा गौरव.. | ए.आय. तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांचा ऊस पिकाचे उत्पादन वाढून भरीव आर्थिक फायदा- हर्षवर्धन पाटील | उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना बिस्कीट व प्रसादाचे वाटप | "आषाढी एकादशीच्या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि चंद्रभागा नदीचे भाविकांनी घेतले मनोभावे दर्शन" | सिंधू बँक स्टाफ सोसायटी ची 40 वी वार्षिक सर्वसाधारण सभा पत्रकार भवन, सिंधुदुर्गनगरी ओरोस येथे उत्साहात संपन्न. | टाकेवाडीत आषाढी एकादशीनिमित्त दिंडी सोहळा उत्साहात; विठ्ठल नामाच्या जयघोषाने परिसर दुमदुमला | गोंदवलेत शाळा व दवाखाना परिसर कचरामय; ग्रामस्थांचा संताप | तोरसोळे येथे बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण गोठ्यात घुसून मध्यरात्री केला हल्ला; वन विभागाकडून तातडीने कारवाईची मागणी | मानपाडा-वाघाडी व सोनाळे खुबरोखपाडा अंधारात; १७ दिवसांपासून वीजपुरवठा खंडित, संतप्त ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा |