उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना बिस्कीट व प्रसादाचे वाटप

👤 तुषार शिंगाडे सिंधुदुर्ग | 📅 27 July 2026 | 👁 339 Views
उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना बिस्कीट व प्रसादाचे वाटप
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने वैभववाडी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांना बिस्कीट आणि पंढरपूर येथून विशेषत्वाने आणलेल्या प्रसादाचे वाटप करण्यात आले. या सामाजिक उपक्रमाने उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला.

ग्रामीण रुग्णालयातील सर्व रुग्णांची विचारपूस करत त्यांना बिस्कीट व पंढरपूरचा प्रसाद देण्यात आला. या वेळी उपस्थित रुग्णांनी व त्यांच्या नातेवाईकांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले.

या उपक्रमाप्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख नंदू शिंदे तालुका सचिव गुलजार काझी, माजी तालुकाप्रमुख अशोक रावराणे तालुका महिला संघटक दिव्या पाचकुडे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे तालुका अध्यक्ष रविंद्र चव्हाण, विभागप्रमुख यशवंत गव्हाणकर, नगरसेवक बंडू सावंत दीपक पवार यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |