"आषाढी एकादशीच्या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि चंद्रभागा नदीचे भाविकांनी घेतले मनोभावे दर्शन"

👤 रघुनाथ देवकर माळशिरस | 📅 27 July 2026 | 👁 147 Views
"आषाढी एकादशीच्या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर  आणि चंद्रभागा नदीचे  भाविकांनी घेतले मनोभावे दर्शन"
देवशयनी आषाढी एकादशीचे औचित्य साधून चंद्रभागा नदीत स्नान करून चंद्रभागा नदीचे दर्शन घेऊन जगाचे दैवत श्री विठ्ठल रुक्मिणी माता यांचे दर्शन मनोभावे घेण्यासाठी अंतकरणापासून नामस्मरण करीत कोणाची वाऱ्याची कसलीही तमा न बाळगता हसत खेळत "ज्ञानोबा तुकारामाच्या जयघोषामध्ये ,पुंडलिक ,वरदे हरी विठ्ठलच्या" घोषणांनी नाचत ,बागडत उपस्थिती दाखवून असंख्य भाविक भक्तांनी आनंद व्यक्त केल्याचे चित्र दिसून आले. आज पंढरपूर नगरीला दिव्य भव्य असे स्वरूप प्राप्त झाले होते .आज पंढरीकडे पाहता वर्णन कोणत्या शब्दांमध्ये करावे हे सुद्धा अनेक साहित्यिकांना सुद्धा मोठा प्रश्न पडला होता. इतकं सौंदर्य पंढरपूर मध्ये दिसून येत होतं. आज असंख्य भाविक भक्तांच्या चेहऱ्यावरती चंद्रभागा नदी आणि श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन घेतल्यामुळे मोठे तेज दिसून आले. जागोजागी भगव्या पता की आणि पांढऱ्या शुभ्र वारकरी वेशांमध्ये गळ्यामध्ये विना टाळ चिपळी कपाळी गंध अशा प्रकारचे चित्र संपूर्ण पंढरपूर मध्ये दिसून आले.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना बिस्कीट व प्रसादाचे वाटप | "आषाढी एकादशीच्या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि चंद्रभागा नदीचे भाविकांनी घेतले मनोभावे दर्शन" | सिंधू बँक स्टाफ सोसायटी ची 40 वी वार्षिक सर्वसाधारण सभा पत्रकार भवन, सिंधुदुर्गनगरी ओरोस येथे उत्साहात संपन्न. | टाकेवाडीत आषाढी एकादशीनिमित्त दिंडी सोहळा उत्साहात; विठ्ठल नामाच्या जयघोषाने परिसर दुमदुमला | गोंदवलेत शाळा व दवाखाना परिसर कचरामय; ग्रामस्थांचा संताप | तोरसोळे येथे बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण गोठ्यात घुसून मध्यरात्री केला हल्ला; वन विभागाकडून तातडीने कारवाईची मागणी | मानपाडा-वाघाडी व सोनाळे खुबरोखपाडा अंधारात; १७ दिवसांपासून वीजपुरवठा खंडित, संतप्त ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा | हरिनामाच्या गजरात बाल दिंडीचा सोहळा रंगला मायणी प्राथमिक शाळा मुले व मुली सहभाग | मायणी पक्षी आश्रयास्थानाच्या दुरवस्थेप्रकरणी वनविभागाला आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे निवेदन | ज्येष्ठ नागरिक संघ इंदापूरच्या मासिक बैठकीत ५१ सदस्यांची मोफत आरोग्य तपासणी; वाढदिवसानिमित्त गुणगौरव |