टाकेवाडीत आषाढी एकादशीनिमित्त दिंडी सोहळा उत्साहात; विठ्ठल नामाच्या जयघोषाने परिसर दुमदुमला

👤 आकाश दडस सातारा | 📅 27 July 2026 | 👁 182 Views
टाकेवाडीत आषाढी एकादशीनिमित्त दिंडी सोहळा उत्साहात; विठ्ठल नामाच्या जयघोषाने परिसर दुमदुमला
आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त माण तालुक्यातील टाकेवाडी येथे पारंपरिक दिंडी सोहळा अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी निघालेल्या श्री संत बाळूमामा दिंडीचे गावात आगमन होताच संपूर्ण गाव भक्तिरसात न्हाऊन निघाले. विठ्ठल मंदिर परिसरात "पुंडलिक वरदा हरी विठ्ठल", "ज्ञानोबा-तुकाराम" अशा जयघोषांनी वातावरण भारावून गेले.


दिंडीच्या स्वागतासाठी गावातील महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक, युवक तसेच विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. भगव्या पताका, टाळ-मृदंगाचा निनाद आणि विठ्ठल नामाच्या अखंड गजराने संपूर्ण टाकेवाडी भक्तिमय झाली. यावेळी माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी विठ्ठल भक्तीपर गीतांवर आकर्षक नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली.विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त दाद दिली.कार्यक्रमानंतर गावातील सर्व ग्रामस्थ, वारकरी आणि विद्यार्थ्यांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या महाप्रसादाचा शेकडो भाविकांनी लाभ घेतला.


संपूर्ण सोहळ्याचे नियोजन व आयोजन ग्रामपंचायत टाकेवाडी यांच्या वतीने करण्यात आले. गावातील सर्व नागरिकांनी एकत्र येत कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले. धार्मिक परंपरा, सामाजिक ऐक्य आणि वारकरी संस्कृतीचे दर्शन घडवणारा हा दिंडी सोहळा टाकेवाडीकरांसाठी अविस्मरणीय ठरला.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना बिस्कीट व प्रसादाचे वाटप | "आषाढी एकादशीच्या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि चंद्रभागा नदीचे भाविकांनी घेतले मनोभावे दर्शन" | सिंधू बँक स्टाफ सोसायटी ची 40 वी वार्षिक सर्वसाधारण सभा पत्रकार भवन, सिंधुदुर्गनगरी ओरोस येथे उत्साहात संपन्न. | टाकेवाडीत आषाढी एकादशीनिमित्त दिंडी सोहळा उत्साहात; विठ्ठल नामाच्या जयघोषाने परिसर दुमदुमला | गोंदवलेत शाळा व दवाखाना परिसर कचरामय; ग्रामस्थांचा संताप | तोरसोळे येथे बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण गोठ्यात घुसून मध्यरात्री केला हल्ला; वन विभागाकडून तातडीने कारवाईची मागणी | मानपाडा-वाघाडी व सोनाळे खुबरोखपाडा अंधारात; १७ दिवसांपासून वीजपुरवठा खंडित, संतप्त ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा | हरिनामाच्या गजरात बाल दिंडीचा सोहळा रंगला मायणी प्राथमिक शाळा मुले व मुली सहभाग | मायणी पक्षी आश्रयास्थानाच्या दुरवस्थेप्रकरणी वनविभागाला आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे निवेदन | ज्येष्ठ नागरिक संघ इंदापूरच्या मासिक बैठकीत ५१ सदस्यांची मोफत आरोग्य तपासणी; वाढदिवसानिमित्त गुणगौरव |