मानपाडा-वाघाडी व सोनाळे खुबरोखपाडा अंधारात; १७ दिवसांपासून वीजपुरवठा खंडित, संतप्त ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा

👤 जितेंद्र मोरघा प्रतिनिधी पालघर | 📅 27 July 2026 | 👁 176 Views
मानपाडा-वाघाडी व सोनाळे खुबरोखपाडा अंधारात; १७ दिवसांपासून वीजपुरवठा खंडित, संतप्त ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा
डहाणू तालुक्यातील मानपाडा-वाघाडी आणि सोनाळे खुबरोखपाडा या भागात गेल्या १० जुलै २०२६ पासून आज २७ जुलै २०२६ पर्यंत वीजपुरवठा पूर्णपणे खंडित असून, तब्बल १७ दिवसांपासून नागरिक अंधारात जीवन जगत आहेत. सततच्या वीजखंडितीमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून, ग्रामस्थांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
स्थानिकांच्या माहितीनुसार, या परिसरातील वीज वितरणासाठी असलेली डीपी पूर्णपणे जीर्ण झाली असून ती सडलेली, तुटलेली व काही ठिकाणी जळालेल्या अवस्थेत आहे. तसेच वीजवाहिन्याही तुटलेल्या व खराब झालेल्या असल्याने वीजपुरवठा सुरू होऊ शकलेला नाही. गंभीर बाब म्हणजे, वारंवार तक्रारी करूनही महावितरणचे वायरमन किंवा संबंधित अधिकारी घटनास्थळी पोहोचले नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
वीज नसल्यामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यास, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. रात्रीच्या वेळी संपूर्ण परिसर अंधारात बुडाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत भारतीय अस्मिता पार्टीचे पालघर जिल्हाध्यक्ष, आदिवासी अस्मिता संघटनेचे पालघर जिल्हाध्यक्ष तसेच ट्रायबल फोरम कोकण विभागीय अध्यक्ष विलास वांगड यांनी महावितरण प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. संबंधित डीपीची तातडीने दुरुस्ती अथवा नवीन डीपी बसवून वीजपुरवठा पूर्ववत करावा, अशी त्यांनी मागणी केली आहे.
तसेच, या जीर्ण डीपीमुळे भविष्यात कोणतीही दुर्घटना घडल्यास महावितरण डहाणू व सूर्यानगर कार्यालय जबाबदार राहील, असा इशाराही त्यांनी दिला आहे. लवकरात लवकर वीजपुरवठा सुरू न झाल्यास ग्रामस्थ, विद्यार्थी आणि प्रसारमाध्यमांच्या उपस्थितीत महावितरणच्या डहाणू व सूर्यानगर कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा विलास वांगड यांनी दिला आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |