ज्येष्ठ नागरिक संघ इंदापूरच्या मासिक बैठकीत ५१ सदस्यांची मोफत आरोग्य तपासणी; वाढदिवसानिमित्त गुणगौरव

👤 अतुल सोनकांबळे इंदापूर | 📅 26 July 2026 | 👁 2 Views
ज्येष्ठ नागरिक संघ इंदापूरच्या मासिक बैठकीत ५१ सदस्यांची मोफत आरोग्य तपासणी; वाढदिवसानिमित्त गुणगौरव


ज्येष्ठ नागरिक संघ इंदापूरची मासिक बैठक रविवार, दिनांक २६ जुलै २०२६ रोजी उत्साहात संपन्न झाली. या बैठकीचे औचित्य साधून ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबिरात 'रिसर्च आयु सेंटर, बारामती' या संस्थेचे संधिवात तज्ज्ञ डॉ. उन्मेष पनवेलकर यांनी उपस्थित ५१ ज्येष्ठ नागरिक सभासदांची मोफत गुडघ्याची गादी बनवणारी ट्रीटमेंट व आरोग्य तपासणी केली. या तपासणी कार्यात भिमराव सिद्रिक यांनी मोलाची मदत केली.

कार्यक्रम प्रसंगी संघाचे अध्यक्ष जनार्दन थोरात (मेजर थोरात साहेब), संचालक महादेव तावरे आणि विलास गायकवाड यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त उपस्थित सर्वांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. बैठकीचे प्रास्ताविक बाबासाहेब घाडगे यांनी केले. त्यानंतर संघाच्या पुढील प्रगतीसाठी आणि वाटचालीसाठी हमीदभाई आत्तार, महादेव तावरे व अध्यक्ष मेजर थोरात साहेब यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत आपले मनोगत व्यक्त केले.

या बैठकीस ज्येष्ठ नागरिक संघाचे माजी अध्यक्ष बाबासाहेब घाडगे, उपाध्यक्ष बाळकृष्ण क्षिरसागर, पांडुरंग जगताप, महादेव चव्हाण, पुष्पराज जमदाडे, माजी अध्यक्ष भानुदास पवार, देवराव मते, सौ. जाधव मॅडम, भामरे सर, अनपट आणा, भारत बोराटे सर, जवाहर बोरा, बळी शिंदे, प्रमोद भंडारी, बबन क्षिरसागर, सुभाष महाजन, हरिभाऊ गुजराती, कृष्णा हब्बू आणि अशोक गांनबोटे या सर्वांची प्रमुख उपस्थिती होती.

बैठकीच्या यशस्वी आयोजनानंतर शेवटी नंदकुमार गुजर यांनी उपस्थितांचे आभार मानले. सर्व सदस्यांच्या उत्स्फूर्त सहभागाने ही मासिक बैठक व आरोग्य शिबीर अत्यंत यशस्वीरीत्या पार पडले.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
ज्येष्ठ नागरिक संघ इंदापूरच्या मासिक बैठकीत ५१ सदस्यांची मोफत आरोग्य तपासणी; वाढदिवसानिमित्त गुणगौरव | राष्ट्रीय कर्तव्यात मुढेवाडीचा डंका! अहोरात्र कष्टातून 'SIR' चे काम आटपाडी तालुक्यात प्रथम पूर्ण | देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न..! | महाराष्ट्राचा 'युथ आयकॉन'! पुण्याच्या रामराजे भोसले यांना राष्ट्रीय स्तरावरील मानाचा पुरस्कार | आषाढी एकादशीनिमित्त टाकेवाडीत आरोग्य शिबिर; ११० नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी | माण-खटाव विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्षपदी अभ्यासू युवा नेतृत्व महेश करचे यांची निवड | विकास सोसायट्यांनी खत विक्रीचे लायसन्स तातडीने काढावीत – प्रकाश सावंत | ४ वर्षांपासून रखडलेले भटवाडी–दिर्बादेवी ११ के वी लाइन चे काम अखेर पूर्ण | राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (RBSK)चे काम राम भरोसे, या विरोधात मळेवाड कोंडुरे उपसरपंच हेमंत मराठे करणार उपोषण | रविवारी 'मुक्तसंवाद'मध्ये संगीत विशारद प्रसादजी शेवडे यांच्याशी सुरेल संवाद |