देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न..!

👤 अतुल सोनकांबळे इंदापूर | 📅 26 July 2026 | 👁 197 Views
देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न..!
महाराष्ट्र राज्याचे कर्तृत्ववान, लोकप्रिय मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी, इंदापूर तालुका यांच्या वतीने राधाई हॉल, एसबीआय बँकेसमोर, इंदापूर येथे आयोजित करण्यात आलेले भव्य रक्तदान शिबिर मोठ्या उत्साहात आणि सामाजिक बांधिलकीच्या भावनेने यशस्वीरित्या संपन्न झाले.

या रक्तदान शिबिराला नागरिक, युवा कार्यकर्ते, महिला तसेच भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला असून शेवटच्या आकडेवारीनुसार तब्बल २०१ बाटल्या रक्त संकलन करण्यात आले. अनेक रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान करून समाजाप्रती आपले कर्तव्य पार पाडले. "रक्त आहे… राष्ट्रशक्ती!" हा संदेश प्रत्यक्ष कृतीतून साकार करत वाढदिवसाचा उत्सव सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून साजरा करण्यात आला.

यावेळी देशाचे यशस्वी पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी यांचा अत्यंत प्रेरणादायी 'मन की बात' कार्यक्रम सर्व उपस्थितांनी एकत्रितपणे ऐकला. पंतप्रधानांनी मांडलेले राष्ट्रहित, सामाजिक सहभाग, जनजागृती आणि नागरिकांच्या कर्तव्यभावनेचे विचार उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरले.

तसेच या कार्यक्रमाच्या निमित्ताने SIR (Special Intensive Revision) संदर्भात महत्त्वपूर्ण बैठकही आयोजित करण्यात आली. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार नोंदणी, पडताळणी, जनजागृती आणि बूथस्तरीय नियोजन याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. SIR मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रदीपदादा गारटकर व प्रविण माने यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले तसेच प्रत्येक पात्र मतदारापर्यंत पोहोचण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

यासह इंदापूर तालुका महिला मोर्चाच्यावतीनेही इंदापूर येथील जोतिबा मंदिर इंदापूर या ठिकाणी १०० झाडांचे वृक्षारोपण केले आहे.

या कार्यक्रम प्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष शेखर वढणे, जेष्ठनेते प्रदीपदादा गारटकर, युवा नेते प्रविणभैय्या माने, आकाश कांबळे, मयूर पाटील, माऊली चवरे, अभिजित तांबिले, गजानन वाकसे, तानाजी थोरात, सदानंद शिरदाळे, बाबासाहेब चवरे, दत्तात्रय शेंडे, मंडल अध्यक्ष राम आसबे, किरण गाणबोटे, राजकुमार जठार, तेजस देवकाते, नगरसेवक अनिल पवार, संजय शिंदे, अतुल शेटे पाटील, वसीम बागवान, सतिश पांढरे, पांडुरंग मारकड, दत्तू वणवे, अभिजित घोगरे, महेंद्र काळे, शुभम शिंगाडे, गोरख आदलिंग, मयूर शिंदे, सचिन शिरसट, महिला मंडल अध्यक्ष माधुरी भराटे, योगिता यादव, सारिका पवार, रुपाली रणदिवे, अश्विनी अंकुश व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. व मुक्ताई ब्लड बँक इंदापूर, सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, स्वयंसेवक तसेच आयोजनासाठी परिश्रम घेतलेल्या प्रत्येक सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार. समाजसेवा, राष्ट्रसेवा आणि संघटन बळकटीचा संदेश देणारा हा कार्यक्रम सर्वांच्या सहकार्यामुळे संस्मरणीय ठरला.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |