जिल्हा सत्र,वरिष्ठ दिवाणी न्यायालयासाठी कवठे महांकाळ वकील संघटना आक्रमक.उपोषणाचा इशारा

👤 विद्याधर लोंढे | 📅 25 July 2026 | 👁 247 Views
जिल्हा सत्र,वरिष्ठ दिवाणी न्यायालयासाठी कवठे महांकाळ वकील संघटना आक्रमक.उपोषणाचा इशारा
कवठे महांकाळ येथे अतिरिक्त जिल्हा न्यायालय व दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर बाबत उच्च न्यायालय,मुंबई यांचे मंजुरीचे पत्र मिळून जवळपास एक वर्षाचा कालावधी लोटला आहे.या विषया संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी कुचराई व दिरंगाई करत असल्याने कवठे महांकाळ वकील संघटनेकडून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात दिनांक २८ जुलै पासून बेमुदत साखळी उपोषण करण्याचा इशारा देणारे निवेदन मंगळवार दिनांक २१ जुलै रोजी तहसीलदार अर्चना कापसे यांना देण्यात आले.
कवठे महांकाळ येथे अतिरिक्त जिल्हा न्यायालय आणि दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तरचे कामकाज सुरू झाल्यास तालुक्यातील नागरिकांच्या वेळेची आणि पैशाची बचत होणार आहे.न्यायप्रक्रिया अधिक सुलभ होऊन न्यायव्यवस्था अधिक लोकाभिमुख होण्यास मदत होणार आहे.अशी परिस्थिती असताना कवठे महांकाळ येथे मंजूर झालेल्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय तसेच दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर यांच्या बांधकामास मंजूर आराखडा प्रमाणे नकाशा व अंदाजपत्रके त्वरित तयार करून देण्यास सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी टाळाटाळ करत असल्याचे तसेच माहिती मागितली असता उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचे देखील या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
तालुक्यातील प्रलंबित दावे,खटले यांची संख्या पाहता सदरची न्यायालये कवठे महांकाळ येथे लवकरात लवकर सुरू होणे हे येथील नागरिकांच्या दृष्टीने हिताचे व सोयीचे आहे.याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना वारंवार कळवून देखील जाणून बुजून त्रुटी असलेले प्रस्ताव त्यांच्याकडून सादर केले जात असल्याने दिनांक २८ जुलै पासून बेमुदत साखळी उपोषणाचा इशारा देखील या निवेदनाद्वारे कवठे महांकाळ वकील संघटनेच्या वतीने देण्यात आलेला आहे.यावेळी वकील संघटनेचे अध्यक्ष रमाकांत पाटील,उपाध्यक्षा विद्या पाटील,संघटनेचे ज्येष्ठ सभासद,इतर सभासद आणि महिला सभासद उपस्थित होते.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |