महाराष्ट्रातील अनेक साधुसंत महंत महाराज यांचे दिंडी सोहळे व पालखी सोहळे वाखरी येथून पंढरपूर नगरीमध्ये "टाळ मृदुंगाच्या गजरात व ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषामध्ये"अतिशय उत्साहाने श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी देवशयनी आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला भक्तिमय वातावरणात दाखल झाले असून तीर्थक्षेत्र पंढरपूरनगरी आनंदाने न्हाहून निघाल्याचे चित्र दिसून येत असून वारकरी बंधू भगिनी दर्शनासाठी उत्सुक झाल्याचे दिसून येत असून प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती तेज निर्माण झाल्याचे दिसून आले. संपूर्ण पंढरपूर नगरी भगव्या पताक्यांनी सजलेली व तेजस्वी दिसत आहे.