आषाढी एकादशीनिमित्त माडगूळे येथे शाळेच्या वतीने दिंडी सोहळ्याचे आयोजन

👤 नंदकुमार विभूते, आटपाडी | 📅 24 July 2026 | 👁 119 Views
आषाढी एकादशीनिमित्त माडगूळे येथे शाळेच्या वतीने दिंडी सोहळ्याचे आयोजन
श्रद्धा ,भक्ती आणि एकात्मतेचा संदेश देत माडगूळे येथील जि,प, शाळा सर्व अंगणवाड्या व कामगार कल्याण केंद्र यांच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त बाल दिंडी व रिंगण सोहळा उत्साहात पार पडला, पारंपारिक वेशभूषा टाळ- मृदंगाचा गजर, भगव्या पताका आणि विठ्ठल नामाच्या उद्घोषात शाळा परिसर, व गाव परिसर भक्तीमय झाला, प्रत्यक्ष प्रति पंढरपूर अवतरले असा भास निर्माण झाला, विद्यार्थ्यानी विठ्ठल रुक्मिणी ,संत ज्ञानेश्वर, संत निवृत्ती, संत तुकाराम ,संत गोरा कुंभार ,संत सोपान काका ,संत मुक्ताई यांच्या वेशभूषा साकारल्या, शिस्तबद्ध पद्धतीने काढण्यात आलेल्या दिंडीमुळे प्रत्यक्ष पंढरपूर वारीचा आनंद मिळाला, सुरुवातीला माडगुळे ग्रामपंचायतचे माजी सरपंच श्री संजय विभुते, पोलीस पाटील श्री दत्तात्रय वाघमारे यांच्या हस्ते विठ्ठल -रुक्मिणीचे व पालखीचे पूजन करण्यात आले या पालखीचे गावातून प्रदक्षिना घेते वेळी वेगवेगळ्या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणीचे व पालखीचे पूजन व औक्षण करण्यात आले, भारत गवळी यांनी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप केले,
हा दिंडी सोहळा पार पडण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक जिल्हा परिषद शाळेचा पूर्ण स्टाफ ,अंगणवाडी व कामगार कल्याण केंद्राचा सर्व स्टाफ यांचे मोलाचे सहकार्य लाभले,,,,
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |