देशभक्ती, स्वाभिमान आणि सामाजिक बांधिलकी जोपासणे हीच टिळकांना खरी आदरांजली : प्रा. के. के. रानगर

👤 सतीशकुमार पडोळकर | 📅 23 July 2026 | 👁 437 Views
देशभक्ती, स्वाभिमान आणि सामाजिक बांधिलकी जोपासणे हीच टिळकांना खरी आदरांजली : प्रा. के. के. रानगर
जत : (प्रतिनिधी)-
राजे रामराव महाविद्यालय, जत  सांस्कृतिक विभाग व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) यांच्या संयुक्त विद्यमाने लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. के. के. रानगर हे होते, तर मा. श्री. प्रभाकरभाऊ जाधव हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी प्रमुख पाहुणे मा. श्री. प्रभाकरभाऊ जाधव म्हणाले, "लोकमान्य टिळकांनी भारतीयांच्या मनात स्वराज्याची ज्योत चेतवली. शिक्षण, राष्ट्रप्रेम, सामाजिक जागृती आणि संघटनशक्ती यांच्या माध्यमातून त्यांनी स्वातंत्र्यलढ्याला नवी दिशा दिली. आजच्या युवकांनी त्यांच्या विचारांचे अनुकरण करून जबाबदार नागरिक म्हणून राष्ट्रविकासात सक्रिय योगदान द्यावे. टिळकांचे विचार हे केवळ इतिहास नसून ते आजच्या काळातील प्रेरणादायी जीवनमूल्ये आहेत."
अध्यक्षीय भाषणात प्रा. के. के. रानगर यांनी सांगितले, "लोकमान्य टिळकांचे व्यक्तिमत्त्व हे ज्ञान, धैर्य आणि राष्ट्रनिष्ठेचा आदर्श आहे. विद्यार्थ्यांनी गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच देशभक्ती, स्वाभिमान, सामाजिक बांधिलकी आणि चारित्र्याची मूल्ये जोपासली तरच टिळकांच्या कार्याला खरी मानवंदना ठरेल. त्याचबरोबर आपल्या स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे संकल्पक संस्थापक थोर स्वातंत्र्यसेनानी शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या त्यागाचे स्मरण करणे ही आज काळाची गरज आहे."

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सांस्कृतिक विभागाचे समन्वयक डॉ. सतीशकुमार पडोळकर यांनी केले. त्यांनी लोकमान्य टिळक यांच्या कार्याचा परिचय करून देत जयंती साजरी करण्यामागील उद्देश स्पष्ट केला. आभार प्रा. विशाल गोडबोले यांनी मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सांस्कृतिक विभाग व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |