माण पंचायत समितीत वृक्षारोपण व स्वच्छता अभियान; पर्यावरण संवर्धनाचा दिला संदेश

👤 आकाश दडस सातारा | 📅 22 July 2026 | 👁 416 Views
माण पंचायत समितीत वृक्षारोपण व स्वच्छता अभियान; पर्यावरण संवर्धनाचा दिला संदेश
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त माण पंचायत समिती, दहिवडी येथे वृक्षारोपण व स्वच्छता अभियान उत्साहात पार पडले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देतानाच स्वच्छतेबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

कार्यक्रमाची सुरुवात पंचायत समिती परिसरात वृक्षारोपण करून करण्यात आली. त्यानंतर परिसरात साचलेला प्लास्टिक व इतर घनकचरा गोळा करून स्वच्छता करण्यात आली. परिसर स्वच्छ, सुंदर व प्रदूषणमुक्त ठेवण्याचा संकल्प यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला.

या अभियानात पंचायत समितीचे सभापती विक्रम शिंगाडे, गटविकास अधिकारी प्रदीप शेंडगे, उपसभापती सौ. प्रियंकाताई जगदाळे, पंचायत समिती सदस्या गौरीताई तुपे, जिल्हा परिषद सदस्या शीतल रणपिसे, सहाय्यक गटविकास अधिकारी खाडे तसेच पंचायत समितीचे सर्व खाते प्रमुख,अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.

विशेष म्हणजे, सभापती विक्रम शिंगाडे आणि गटविकास अधिकारी प्रदीप शेंडगे यांच्या सह सर्व पदाधिकारी व अधिकारी यांनी स्वतः हातात झाडू व स्वच्छतेची साधने घेऊन अभियानात सक्रिय सहभाग नोंदविला. त्यांच्या या कृतीमुळे उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्येही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी स्वच्छता ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी असून पर्यावरण संरक्षणासाठी अधिकाधिक वृक्ष लागवड करणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले. सार्वजनिक ठिकाणी प्लास्टिकचा वापर टाळून स्वच्छ व हरित परिसर निर्माण करण्याचे आवाहनही करण्यात आले.

या उपक्रमामुळे पंचायत समिती परिसर अधिक स्वच्छ व सुशोभित झाला असून, "स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धन हीच खरी समाजसेवा" असा संदेश या अभियानातून देण्यात आला. उपस्थितांनी या उपक्रमाचे स्वागत करत अशा सामाजिक उपक्रमांचे सातत्याने आयोजन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |