दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील मारहाणीविरोधात तासगावात भर पावसात बेमुदत धरणे आंदोलन

👤 संतोष एडके तासगाव | 📅 22 July 2026 | 👁 558 Views
दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील मारहाणीविरोधात तासगावात भर पावसात बेमुदत धरणे आंदोलन

दिल्ली येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित अमानुष मारहाणीचा तसेच सरकारच्या हुकूमशाही भूमिकेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यासाठी तासगाव शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरा भर पावसात बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
​या आंदोलनात स्थानिक सुधार समितीचे अध्यक्ष संदेश भंडारे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पुरण मलमे, प्रमोद सावंत, राहुल माने, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे निलेश गवाळे, अरुण साळुंखे यांच्यासह विविध सामाजिक व राजकीय संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.
​आंदोलकांनी विद्यार्थ्यांवर झालेल्या कारवाईचा तीव्र निषेध नोंदवत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच विद्यार्थ्यांचा आवाज दडपण्याचा कोणताही प्रयत्न लोकशाहीसाठी घातक असल्याचे सांगत, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि लोकशाही मूल्यांचे संरक्षण करण्याची गरज व्यक्त केली.
​मुसळधार पावसाची पर्वा न करता आंदोलकांनी धरणे आंदोलन सुरूच ठेवले असून, "लोकशाही वाचली पाहिजे", "विद्यार्थ्यांवरील अन्याय बंद करा" अशा जोरदार घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. संबंधित घटनेची निष्पक्ष चौकशी करून विद्यार्थ्यांना लवकरात लवकर न्याय मिळावा, अशी आग्रही मागणीही सर्व आंदोलनकर्त्यांनी केली आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |