जिल्हास्तरीय एकात्मिक आरोग्यवर्धिनी समितीवर नगराध्यक्ष संदेश पारकर यांची सदस्यपदी नियुक्ती

👤 तुषार शिंगाडे सिंधुदुर्ग | 📅 22 July 2026 | 👁 271 Views
जिल्हास्तरीय एकात्मिक आरोग्यवर्धिनी समितीवर नगराध्यक्ष संदेश पारकर यांची सदस्यपदी नियुक्ती
महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने स्थापन केलेल्या जिल्हास्तरीय एकात्मिक आरोग्यवर्धिनी समितीवर कणकवली नगरपंचायतीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांची सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या १४ मे २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार ही समिती गठित करण्यात आली असून, जिल्हा शल्यचिकित्सक तथा समितीचे सदस्य सचिव डॉ. श्रीपाद एम. पाटील यांनी १५ जुलै २०२६ रोजी अधिकृत पत्राद्वारे संदेश पारकर यांना नियुक्तीची माहिती दिली आहे.

राज्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम व प्रभावी करण्यासाठी, राष्ट्रीय आरोग्य अभियान आणि विविध आरोग्य योजनांची प्रभावी अंमलबजावणी,
वाढविण्याच्या उद्देशाने या समितीची स्थापना
करण्यात आली आहे.

सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष म्हणून पालकमंत्री नितेश राणे कार्यभार सांभाळणार असून, समितीमध्ये विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींचा समावेश करण्यात आला आहे. नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या नियुक्तीमुळे कणकवलीचे प्रतिनिधित्व जिल्हास्तरीय आरोग्यविषयक निर्णय प्रक्रियेत होणार आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |