जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या देहू ते पंढरपूर पालखी सोहळ्यात गेल्या २५ वर्षांपासून रेड स्वस्तिक सोसायटी ऑफ इंडिया तर्फे मोफत आरोग्य सेवा पुरवण्यात येत आहे. या उल्लेखनीय कार्याबद्दल महाराष्ट्राचे ग्रामविकास जयकुमार गोरे यांनी संस्थेच्या कार्याचे भरभरून कौतुक केले.
पालखी मार्गावरील आरोग्य शिबिरास भेट देताना मंत्री गोरे म्हणाले, "रेड स्वस्तिक सोसायटी जगद्गुरु तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात निस्वार्थपणे मानव सेवा करून वारकऱ्यांची सेवा करत आहे. संस्थेचे २५ वर्षांपासूनचे हे कार्य खरोखरच कौतुकास्पद आहे."
यावेळी त्यांना संस्थेतर्फे रेड स्वस्तिकचा वर्धापन दिन विशेषांक देऊन सन्मानित करण्यात आले.
रेड स्वस्तिक सोसायटी ऑफ इंडिया ही जागतिक पातळीवर आरोग्य सेवा प्रदान करणारी संस्था आहे. ऑल इंडिया स्तरावर विविध आरोग्य कॅम्प्सचे आयोजन ही संस्था सातत्याने करते.
पालखी सोहळ्यातील आरोग्य पथकाचे नेतृत्व प्रोजेक्ट डायरेक्टर संतोष राजगुरू यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी करत आहेत.
या २५ वर्षांच्या सेवेत IPS अधिकारी डॉ. टी. एस भाल, सुरेश कोते, अशोक शिंदे, जयसिंगराव पवार, डॉ. दत्ता खुणे यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.
यावेळी विलास गायकवाड, बापू माने, गजानन गोरे, रेखा गोरे, अभिजीत बेलेकर, राजू बेडगे, विजय नेचकर, नितीन उकिरे आदी. उपस्थित होते.
२५ वर्षांपासून अविरतपणे वारकऱ्यांची सेवा करणाऱ्या रेड स्वस्तिकच्या आरोग्य पथकाला पालखी सोहळ्यातील वारकरी आणि मान्यवरांकडूनही भरभरून दाद मिळत आहे.