दयानंद मांगले यांचे जाणे ही पत्रकारितेची कधीही भरून न निघणारी पोकळी" – उमेश तोरस्कर

👤 तुषार शिंगाडे सिंधुदुर्ग | 📅 19 July 2026 | 👁 71 Views
दयानंद मांगले यांचे जाणे ही पत्रकारितेची कधीही भरून न निघणारी पोकळी"  – उमेश तोरस्कर
"दयानंद मांगले यांचे जाण्याचे वय नव्हते. त्यांच्या निधनाने पत्रकारितेतील एक संवेदनशील, अभ्यासू आणि निष्ठावान सहकारी आपण गमावला आहे. ही पोकळी सहज भरून निघणारी नाही. पत्रकारांनी आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेणे काळाची गरज असून, सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने लवकरच पत्रकारांसाठी आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येईल," असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरस्कर यांनी केले.

ज्येष्ठ पत्रकार तथा देवगड तालुका पत्रकार समितीचे उपाध्यक्ष दयानंद मांगले यांच्या निधनानिमित्त देवगड तालुका पत्रकार समितीच्या वतीने आयोजित शोकसभेत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
यावेळी देवगड तालुका पत्रकार समितीचे तालुकाध्यक्ष हेमंत कुलकर्णी, जिल्हा उपाध्यक्ष आनंद लोके, जिल्हा सदस्य प्रशांत वाडेकर, उपाध्यक्ष अनिल राणे, तालुका सचिव दिनेश साटम, सहसचिव सचिन लळीत, माजी अध्यक्ष अयोध्याप्रसाद गावकर, सदस्य सुरज कोयंडे, राजीव पडवळ, स्वप्निल लोके, नागेश दुखंडे, श्रीकृष्ण रानडे तसेच तालुक्यातील अनेक पत्रकार उपस्थित होते.

तालुकाध्यक्ष हेमंत कुलकर्णी यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, संघटनात्मक कार्यात नेहमीच सक्रिय सहभाग घेणारा, जबाबदारीने काम करणारा सक्षम पदाधिकारी आपण गमावला आहे. त्यांच्या निधनामुळे पत्रकार संघटनेचे मोठे नुकसान झाले असून, त्यांची उणीव कायम जाणवत राहील.

जिल्हा उपाध्यक्ष आनंद लोके यांनी दयानंद मांगले हे उत्तम मित्र, अभ्यासू पत्रकार आणि अनेक तरुण पत्रकारांचे मार्गदर्शक होते, असे सांगत त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न निघणारी असल्याचे नमूद केले.
जिल्हा सदस्य प्रशांत वाडेकर यांनी मांगले यांचे विविध शासकीय विभागांशी उत्तम संबंध होते. संयमी, सुसंवादी आणि सर्वांना सोबत घेऊन काम करणारा आदर्श पत्रकार आपण गमावल्याची भावना व्यक्त केली.

माजी अध्यक्ष अयोध्याप्रसाद गावकर यांनी दयानंद मांगले यांचे समाजातील सर्व स्तरांतील व्यक्तींशी जिव्हाळ्याचे संबंध होते. ते अजातशत्रू पत्रकार होते आणि त्यांच्या निधनाने पत्रकारितेची मोठी हानी झाल्याचे सांगितले.
शेवटी उपस्थितांनी दिवंगत दयानंद मांगले यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून दोन मिनिटे मौन पाळले. शोकसभेचे प्रास्ताविक तालुका सचिव दिनेश साटम यांनी केले.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
आषाढी एकादशीनिमित्त टाकेवाडीत आरोग्य शिबिर; ११० नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी | माण-खटाव विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्षपदी अभ्यासू युवा नेतृत्व महेश करचे यांची निवड | विकास सोसायट्यांनी खत विक्रीचे लायसन्स तातडीने काढावीत – प्रकाश सावंत | ४ वर्षांपासून रखडलेले भटवाडी–दिर्बादेवी ११ के वी लाइन चे काम अखेर पूर्ण | राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (RBSK)चे काम राम भरोसे, या विरोधात मळेवाड कोंडुरे उपसरपंच हेमंत मराठे करणार उपोषण | रविवारी 'मुक्तसंवाद'मध्ये संगीत विशारद प्रसादजी शेवडे यांच्याशी सुरेल संवाद | उपरण्यावर अवतरला पंढरीचा विठुराया; देवगडच्या कलाकाराची भक्तीला रंगांची अनोखी अर्पणवेल | पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपाचा मदतीचा हात; जीवनावश्यक अन्नधान्य किटचे वाटप | आषाढी एकादशीचे अनोखे कलादर्शन; तांदळाच्या दाण्यावर अवतरले पांडुरंग;रिया कांबळीच्या अद्वितीय कलेला सलाम.. | तासगावच्या दीडशे वर्षांच्या सांस्कृतिक वारशाचा अमूल्य ठेवाही ठरतोय जीर्णोद्धाराची गरज! ​तासगावच्या गुरुवार पेठेतील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचा समृद्ध इतिहास व धार्मिक परंपरा |