सोलापूर जिल्ह्यात विशेष लोकअदालतीला यश

👤 आशुतोष फसाले | 📅 19 July 2026 | 👁 169 Views
सोलापूर जिल्ह्यात विशेष लोकअदालतीला यश
१४६ धनादेश प्रकरणे निकाली, ३.७० कोटींची तडजोड , २० वर्ष जुने १ तर १० वर्षांपेक्षा जास्त जुनी १४ प्रकरणे मार्गी
सोलापूर, दि. १८ जुलै २०२६: महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सोलापूरचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्ह्यात धनादेश अनादर (Cheque Bounce) प्रकरणांसाठी विशेष लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या लोकअदालतीतून एकूण ३ कोटी ७० लाख ५७ हजार ४३७ रुपये इतके मूल्य असलेली १४६ प्रकरणे तडजोडीने निकाली निघाली.

परक्राम्य संलेख अधिनियम १९८१ (Negotiable Instruments Act) अंतर्गत दाखल प्रकरणांचा जलद, सुलभ आणि सामंजस्यपूर्ण मार्गाने निपटारा करण्यासाठी ही विशेष लोकअदालत घेण्यात आली. न्यायालयात प्रलंबित असलेल्या व तडजोडीची शक्यता असलेल्या प्रकरणांमध्ये दोन्ही पक्षांच्या परस्पर संमतीने तोडगा काढण्यात आला.

जुनी प्रकरणे मार्गी:
निकाली काढण्यात आलेल्या १४६ प्रकरणांपैकी २० वर्षांपेक्षा जुने १ प्रकरण तर १० वर्षांपेक्षा जास्त कालावधीची १४ प्रकरणे सामंजस्याने निकाली निघाली.

*जिल्हाभर आयोजन:*
सोलापूर मुख्यालयासाठी सेवानिवृत्त न्यायाधीश व्ही. आर. दासरी यांनी पॅनल प्रमुख म्हणून तर विधिज्ञ व्ही. व्ही. कुर्ले यांनी पॅनल सदस्य म्हणून काम पाहिले. जिल्ह्यातील सर्व तालुका विधी सेवा समितीच्या ठिकाणीही विशेष लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण जिल्ह्यातून एकूण १० पॅनल स्थापन करण्यात आले होते.

लोकअदालत यशस्वी करण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव यांच्या देखरेखीखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे कर्मचारी, पॅनल विधिज्ञ तसेच न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

लोकअदालतीची आकडेवारी:
- एकूण ठेवलेली प्रकरणे: ३३६७
- एकूण तडजोड झालेली प्रकरणे: १४६
- एकूण तडजोड रक्कम:३,७०,५७,४३७/- रुपये

तालुकानिहाय तडजोड झालेली प्रकरणे:
- सोलापूर: ४८ प्रकरणे, रक्कम रु. २,१४,३१,९६०/-
- सांगोला:३० प्रकरणे, रक्कम रु. ३०,५९,७००/-
- बार्शी: १८ प्रकरणे, रक्कम रु. १६,८५,१४३/-
- पंढरपूर: १७ प्रकरणे, रक्कम रु. ४१,२८,९९७/-
- माळशिरस:१४ प्रकरणे, रक्कम रु. १६,७९,७४९/-
- मंगळवेढा: ०८ प्रकरणे, रक्कम रु. २८,२५,३४६/-
- मोहोळ: ०४ प्रकरणे, रक्कम रु. ६,०२,८३१/-
- अक्कलकोट:०३ प्रकरणे, रक्कम रु. २,२३,४११/-
- करमाळा: ०३ प्रकरणे, रक्कम रु. १०,७०,३००/-
- माढा: ०१ प्रकरण, रक्कम रु. ३,५०,०००/-
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |