नातेपुते, माळशिरस येथे अन्न व औषध प्रशासनाची कारवाई: ५३ हजारांचा पॅकेज्ड वॉटर व ज्यूस साठा जप्त, व्यवसाय बंदचे आदेश

👤 आशुतोष फसाले | 📅 19 July 2026 | 👁 153 Views
नातेपुते, माळशिरस येथे अन्न व औषध प्रशासनाची कारवाई: ५३ हजारांचा पॅकेज्ड वॉटर व ज्यूस साठा जप्त, व्यवसाय बंदचे आदेश
१३८४ लिटर संशयास्पद साठा; लेवल दोष व नियमांचे उल्लंघन
सोलापूर, दि. १८: सोलापूर कार्यालयास मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे अन्न व औषध प्रशासनाने नातेपुते, ता. माळशिरस येथील मे. सत्यवेल अॅग्रोटेक प्रायव्हेट लिमिटेड या आस्थापनेवर अचानक छापा टाकून ५३ हजार रुपये किंमतीचा १३८४ लिटर पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर व मँगो ज्यूसचा साठा जप्त केला. तसेच तपासणीवेळी आढळून आलेल्या त्रुटींची पूर्तता होईपर्यंत आस्थापनेस तत्काळ व्यवसाय बंद करण्याचे निर्देश देण्यात आले, अशी माहिती अन्न औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त साहेबराव देसाई यांनी दिली.

दि. १८ जुलै २०२६ रोजी अन्न सुरक्षा अधिकारी मंगेश म. लवटे व सहकारी अन्न सुरक्षा अधिकारी रमाकांत पाटील यांनी सदर आस्थापनेला भेट देऊन तपासणी केली. यावेळी पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर व मँगो ज्यूस या अन्नपदार्थांचे ०२ नमुने घेण्यात आले. उर्वरित पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरचे ५८४ लिटर व मँगो ज्यूसचे ८०० लिटर, असे एकूण १३८४ लिटर, किंमत रु. ५३,०००/- चा साठा जप्त करण्यात आला.


सदर साठ्यावर लेवल दोष, कमी दर्जा असल्याचा संशय व अन्न सुरक्षा व मानदे कायद्याचे ‘परिशिष्ट IV’ (Schedule IV) मधील नियमांचे उल्लंघन होत असल्याचे आढळून आले. त्यामुळे सदरचा साठा जप्त करून पुढील आदेशापर्यंत विक्रेत्याच्या आस्थापनामध्येच सुरक्षित ठेवण्यात आला आहे.

ही कारवाई आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, मुंबई तुकाराम मुंढे व सह आयुक्त (पुणे विभाग) दि. वा. भोगावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त (अन्न) सा. ए. देसाई, अन्न सुरक्षा अधिकारी मंगेश म. लवटे व सहकारी अन्न सुरक्षा अधिकारी रमाकांत पाटील यांच्या पथकाने पूर्ण केली.

अन्न व औषध प्रशासनाकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, अन्नपदार्थ खरेदी करताना एफएसएसएआय परवाना, उत्पादन व मुदत संपण्याची तारीख, बॅच क्रमांक तपासूनच खरेदी करावा. संशयास्पद अन्नपदार्थांबाबत प्रशासनाला माहिती द्यावी.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |