एसटी महामंडळाचा भोंगळ कारभार : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भावनांचा मांडला खेळ

👤 प्रदीप जानकर शाहुवाडी | 📅 18 July 2026 | 👁 213 Views
एसटी महामंडळाचा भोंगळ कारभार : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भावनांचा मांडला खेळ
कोल्हापूर जिल्हा आणि सांगली जिल्हा यांना जोडणाऱ्या बांबवडे - कोकरूड जिल्हा मार्गावर वाडीचरण,सरूड,शिवारे,माणगाव,भेडसगाव या गावातून अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी बांबवडे व कोकरूड या ठिकाणी जातात. मलकापूर आगारामार्फत या जिल्हा मार्गावर बस सेवा पुरविली जाते.पण आगाराच्या भोंगळ कारभारामुळे या मार्गावरील बस सेवेचे वेळापत्रक कायम कोलमडलेले असते. नादुरुस्त गाड्या, गळक्या गाड्या, या मार्गावर चालत असतात. त्यात त्याही वेळेत नसल्याने सदर गावातील विद्यार्थ्यांना तासनतास ताटकळत बसावे लागते.त्यामुळे वेळेत शाळा,कॉलेजमध्ये न पोहोचल्यामुळे त्यांना शैक्षणिक नुकसान सोसावे लागत आहे. वेळेवर शाळेत पोहोचण्याचे असल्याने सदर विद्यार्थी खाजगी वाहनांचा आधार घेऊन आपला व घरच्यांचा जीव टांगणीला लावत आहेत.
त्यामुळे या भोंगळ कारभारा विरुद्ध प्रवाशांनी आणि नागरिकांनी बर्‍याच वेळा निवेदन दिले आहे. पण याचा परिणाम आगार व्यवस्थापक यांच्यावर झाल्याचे दिसून येते नाही. त्यामुळे लवकरात लवकर आगार व्यवस्थापक यांनी याबाबत निर्णय घ्यावा अशी मागणी या मार्गावरील प्रवाशांनी व विद्यार्थी - पालक यांनी केली आहे. अन्यथा याविरुद्ध तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
आषाढी एकादशीनिमित्त टाकेवाडीत आरोग्य शिबिर; ११० नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी | माण-खटाव विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्षपदी अभ्यासू युवा नेतृत्व महेश करचे यांची निवड | विकास सोसायट्यांनी खत विक्रीचे लायसन्स तातडीने काढावीत – प्रकाश सावंत | ४ वर्षांपासून रखडलेले भटवाडी–दिर्बादेवी ११ के वी लाइन चे काम अखेर पूर्ण | राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (RBSK)चे काम राम भरोसे, या विरोधात मळेवाड कोंडुरे उपसरपंच हेमंत मराठे करणार उपोषण | रविवारी 'मुक्तसंवाद'मध्ये संगीत विशारद प्रसादजी शेवडे यांच्याशी सुरेल संवाद | उपरण्यावर अवतरला पंढरीचा विठुराया; देवगडच्या कलाकाराची भक्तीला रंगांची अनोखी अर्पणवेल | पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपाचा मदतीचा हात; जीवनावश्यक अन्नधान्य किटचे वाटप | आषाढी एकादशीचे अनोखे कलादर्शन; तांदळाच्या दाण्यावर अवतरले पांडुरंग;रिया कांबळीच्या अद्वितीय कलेला सलाम.. | तासगावच्या दीडशे वर्षांच्या सांस्कृतिक वारशाचा अमूल्य ठेवाही ठरतोय जीर्णोद्धाराची गरज! ​तासगावच्या गुरुवार पेठेतील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचा समृद्ध इतिहास व धार्मिक परंपरा |