कातवण किनाऱ्यावर संशयास्पद साहित्याचा शोध; दोन ऑक्सिजन सिलेंडर आढळल्याने खळबळ

👤 तुषार शिंगाडे सिंधुदुर्ग | 📅 18 July 2026 | 👁 194 Views
कातवण किनाऱ्यावर संशयास्पद साहित्याचा शोध; दोन ऑक्सिजन सिलेंडर आढळल्याने खळबळ
देवगड पोलिसांसह फॉरेन्सिक पथकाची घटनास्थळी धाव; पंचनामा करून सिलेंडर व अन्य साहित्य ताब्यात, जहाजावरून वाहत आल्याचा प्राथमिक अंदाज
देवगड तालुक्यातील कातवण समुद्रकिनारी दाेन ऑक्सिजन सिलेंडर व काही साहित्य शनिवारी दुपारच्या सुमारास एका स्थानिक मच्छिमारास आढळून आले.त्यांनी सदर माहिती देवगड पाेलिसांना दिल्यानंतर पाेलिस निरिक्षक श्याम बुवा यांनी पाेलिस कर्मचारी यांचेसमवेत घटनास्थळी भेट दिली.घटनेचा पंचनामा करून दाेन सिलेंडरसह व तेथिल इतर सर्व साहित्य ताब्यात घेतले.

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, कातवण समुद्रकिनारी सिलेंडर सदृश वस्तू व काही साहित्य संशयास्पद स्थितीत असल्याचे तेथिल एका स्थानिक मच्छिमारांनी देवगड पाेलिसांना कळविले.त्यानंतर देवगड पाेलिस निरिक्षक श्याम बुवा, स.पाे.उपनिरिक्षक अनिलकुमार पवार, पाे.काॅ.रविंद्र महाले आदी पाेलिस कर्मचाऱ्यांसमवेत तात्काळ घटनास्थळी भेट दिली.यावेळी फॉरेन्सिक पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले.हे सिलेंडर ऑक्सिजनचे असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट हाेत असून तेथे पाणीपाऊस, प्राेटीन बिस्कीट पॅकेट, स्माेक सिग्नल, हँड फफ्लायर असे साहित्य मिळून आले आहे.समुद्रात वाहतुक करणाऱ्या एखाद्या जहाजावरून अथवा नाैकेवरून ते सिलेंडर व साहित्य पाण्यात पडल्याने ते वाहत समुद्रकिनारी लागले असावेत असा प्राथमिक अंदाज पाेलिसांनी व्यक्त केला आहे.किनारपट्टीवर काेणत्याही प्रकारची संशयास्पद हालचाल दिसून आल्यास अथवा काेणतीही संशयास्पद वस्तू आढळल्यास तात्काळ पाेलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन पाेलिसांच्यावतीने करण्यात आले आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
महाराष्ट्राचा 'युथ आयकॉन'! पुण्याच्या रामराजे भोसले यांना राष्ट्रीय स्तरावरील मानाचा पुरस्कार | आषाढी एकादशीनिमित्त टाकेवाडीत आरोग्य शिबिर; ११० नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी | माण-खटाव विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्षपदी अभ्यासू युवा नेतृत्व महेश करचे यांची निवड | विकास सोसायट्यांनी खत विक्रीचे लायसन्स तातडीने काढावीत – प्रकाश सावंत | ४ वर्षांपासून रखडलेले भटवाडी–दिर्बादेवी ११ के वी लाइन चे काम अखेर पूर्ण | राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (RBSK)चे काम राम भरोसे, या विरोधात मळेवाड कोंडुरे उपसरपंच हेमंत मराठे करणार उपोषण | रविवारी 'मुक्तसंवाद'मध्ये संगीत विशारद प्रसादजी शेवडे यांच्याशी सुरेल संवाद | उपरण्यावर अवतरला पंढरीचा विठुराया; देवगडच्या कलाकाराची भक्तीला रंगांची अनोखी अर्पणवेल | पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपाचा मदतीचा हात; जीवनावश्यक अन्नधान्य किटचे वाटप | आषाढी एकादशीचे अनोखे कलादर्शन; तांदळाच्या दाण्यावर अवतरले पांडुरंग;रिया कांबळीच्या अद्वितीय कलेला सलाम.. |