शेटफळे गावच्या शिरपेचात मानाचा तुरा; कु. सृष्टी भोरे महाराष्ट्र राष्ट्रभाषा परीक्षेत पुणे केंद्रात प्रथम

👤 नंदकुमार विभुते आटपाडी | 📅 18 July 2026 | 👁 176 Views
शेटफळे गावच्या शिरपेचात मानाचा तुरा; कु. सृष्टी भोरे महाराष्ट्र राष्ट्रभाषा परीक्षेत पुणे केंद्रात प्रथम
आटपाडी तालुक्यातील शेटफळे गावची सुकन्या कु. सृष्टी गणपत भोरे हिने महाराष्ट्र राष्ट्रभाषा परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत पुणे केंद्रात प्रथम क्रमांक पटकावला आहे. या दैदिप्यमान यशामुळे शेटफळे गावाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून, परिसरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

कु. सृष्टी भोरे ही एस. एस. पी. एम. एस. डे स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पुणे येथे इयत्ता दहावीमध्ये शिक्षण घेत आहे. शालेय शिक्षणासोबतच महाराष्ट्र राष्ट्रभाषा परीक्षेची मेहनतीने तयारी करून तिने हे उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

या यशामागे शाळेच्या प्राचार्या शिवाली जगताप, वर्गशिक्षिका दिपाली मुळीक, तसेच शाळेतील सर्व शिक्षकवृंद यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभल्याचे सृष्टीने आपल्या मनोगतात सांगितले. याशिवाय आई-वडील, कुटुंबीय आणि सहकाऱ्यांचेही तिला सातत्याने प्रोत्साहन मिळाले.

विशेष म्हणजे, कु. सृष्टी गणपत भोरे ही दैनिक तुफान क्रांतीचे सोलापूर जिल्हा प्रतिनिधी गुलचंद भोरे यांच्या भावाची कन्या असून, कुटुंबीयांच्या पाठिंब्यामुळेच हे यश मिळाल्याची भावना तिने व्यक्त केली.

कु. सृष्टीच्या या उल्लेखनीय यशाबद्दल शाळा, शिक्षक, नातेवाईक, मित्रपरिवार तसेच शेटफळे गावातील नागरिकांकडून तिचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत असून, भविष्यातील शैक्षणिक वाटचालीसाठी तिला हार्दिक शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |