तासगावला प्रांत कार्यालय झाल्यास मी आमरण उपोषण करणार – प्रा. दादासाहेब ढेरे

👤 तुषार शिंगाडे सिंधुदुर्ग | 📅 16 July 2026 | 👁 249 Views
तासगावला प्रांत कार्यालय झाल्यास मी आमरण उपोषण करणार – प्रा. दादासाहेब ढेरे
तासगाव येथे प्रांत कार्यालय स्थापन करण्याच्या हालचालींना विरोध करत जिल्हा विकास व सनियंत्रण समिती, सांगलीचे सदस्य प्रा. दादासाहेब ढेरे यांनी तीव्र भूमिका घेतली आहे. "तासगावला प्रांत कार्यालय झाल्यास मी आमरण उपोषण करीन," असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे.
प्रा. ढेरे म्हणाले की, अंजनी आणि चिंचणी येथील काही नेते म्हणजे संपूर्ण तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघ नव्हे. केवळ मतदारसंख्या अधिक आहे म्हणून त्यांना जास्त भागीदारी मिळावी, ही भूमिका योग्य नाही. "ज्याची मतदारसंख्या भारी त्याचीच ज्यादा भागीदारी" हे धोरण लोकशाहीला मान्य होऊ शकत नाही.
ते पुढे म्हणाले की, "बळी तो कानपिळी" हे सूत्र दिवंगत नेते आर. आर. आबा पाटील यांनी कधीच स्वीकारले नव्हते. त्यांनी नेहमीच सर्व घटकांना समान न्याय देण्याची भूमिका घेतली. मात्र, तासगाव येथे प्रस्तावित प्रांत कार्यालयामुळे कवठेमहांकाळ तालुका आणि येथील नागरिकांवर सर्वांगीण अन्याय होत आहे. हा अन्याय आम्ही कदापि सहन करणार नाही.
शासनाने या निर्णयाचा पुनर्विचार करून कवठेमहांकाळ तालुक्याला न्याय द्यावा, अशी मागणी करत प्रा. ढेरे यांनी स्पष्ट केले की, जर शासनाने तासगाव येथेच प्रांत कार्यालय सुरू करण्याचा निर्णय कायम ठेवला, तर त्याविरोधात आपण आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारू.
प्रांत कार्यालयाच्या मुद्द्यावरून कवठेमहांकाळ तालुक्यातील जनभावना तीव्र होत असून, या विषयावर राजकीय आणि सामाजिक स्तरावर विरोधाचा सूर अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न..! | महाराष्ट्राचा 'युथ आयकॉन'! पुण्याच्या रामराजे भोसले यांना राष्ट्रीय स्तरावरील मानाचा पुरस्कार | आषाढी एकादशीनिमित्त टाकेवाडीत आरोग्य शिबिर; ११० नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी | माण-खटाव विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्षपदी अभ्यासू युवा नेतृत्व महेश करचे यांची निवड | विकास सोसायट्यांनी खत विक्रीचे लायसन्स तातडीने काढावीत – प्रकाश सावंत | ४ वर्षांपासून रखडलेले भटवाडी–दिर्बादेवी ११ के वी लाइन चे काम अखेर पूर्ण | राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (RBSK)चे काम राम भरोसे, या विरोधात मळेवाड कोंडुरे उपसरपंच हेमंत मराठे करणार उपोषण | रविवारी 'मुक्तसंवाद'मध्ये संगीत विशारद प्रसादजी शेवडे यांच्याशी सुरेल संवाद | उपरण्यावर अवतरला पंढरीचा विठुराया; देवगडच्या कलाकाराची भक्तीला रंगांची अनोखी अर्पणवेल | पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपाचा मदतीचा हात; जीवनावश्यक अन्नधान्य किटचे वाटप |