प्रांत कार्यालयावरून कवठेमहांकाळात राजकीय स्फोट!; "जनतेची दिशाभूल थांबवा, अन्याय खपवून घेणार नाही" – भाजप तालुकाध्यक्ष उदयराजे भोसले यांचा सरकारला थेट इशारा, आमदार रोहित पाटील यांच्यावर घणाघाती हल्लाबोल

👤 जगन्नाथ सकट कवठेमंकाळ | 📅 16 July 2026 | 👁 270 Views
प्रांत कार्यालयावरून कवठेमहांकाळात राजकीय स्फोट!; "जनतेची दिशाभूल थांबवा, अन्याय खपवून घेणार नाही" – भाजप तालुकाध्यक्ष उदयराजे भोसले यांचा सरकारला थेट इशारा, आमदार रोहित पाटील यांच्यावर घणाघाती हल्लाबोल
कवठेमहांकाळ तालुक्यासाठी प्रस्तावित प्रांत कार्यालय तासगाव येथे हलविण्याच्या चर्चेला आता राजकीय रंग चढला असून, भाजपचे तालुकाध्यक्ष उदयराजे भोसले यांनी या प्रस्तावाला तीव्र विरोध दर्शविला आहे. "कवठेमहांकाळच्या जनतेवर अन्याय खपवून घेतला जाणार नाही," असा इशारा देत त्यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन तालुक्याची वस्तुस्थिती आणि जनतेच्या भावना मांडल्या. मंत्र्यांनी विषयाची गांभीर्याने दखल घेत योग्य कार्यवाहीचे आश्वासन दिल्याचे भोसले यांनी सांगितले.
भोसले म्हणाले की, प्रांत कार्यालय तासगाव येथे गेल्यास तालुक्याच्या शेवटच्या टोकावरील नागरिकांना सुमारे ८० किलोमीटरपेक्षा अधिकचा प्रवास करावा लागेल. तर जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा न्यायालय, पोलीस अधीक्षक कार्यालय, सिंचन विभाग आणि प्रमुख शासकीय कार्यालये सांगली–मिरज येथे असल्याने जनतेची मोठी गैरसोय होईल.
यावेळी त्यांनी आमदार रोहित पाटील यांच्यावरही टीका करत, शासनासमोर चुकीचे चित्र उभे करून तालुक्याची दिशाभूल केल्याचा आरोप केला. "तालुक्याच्या स्वाभिमानाशी तडजोड केली जाणार नाही. जनहिताविरोधातील कोणत्याही निर्णयाविरोधात रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन केले जाईल," असा इशाराही त्यांनी दिला.
यावेळी जिल्हा सरचिटणीस अनिल लोंढे, एस.आर. प्रमुख धनंजय शिंदे, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष नारायण बंडगर, विजय सूर्यवंशी, सोशल मीडिया प्रमुख सचिन भोसले, चिटणीस सचिन गायकवाड आणि राजाराम पाटील उपस्थित होते.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |