आपण खातो ते पनीर दुधाचे आहे का? तुकाराम मुंढे

👤 राहुल टिबे ईश्वरपूर,सांगली | 📅 14 July 2026 | 👁 275 Views
आपण खातो ते पनीर दुधाचे आहे का? तुकाराम मुंढे
"200 ते 250 रुपयात पनीर कसे मिळते?" - तुकाराम मुंढे यांचा भेसळीबाबत इशारा
अन्नसुरक्षा आणि भेसळीच्या मुद्द्यावर नेहमीच आक्रमक भूमिका घेणारे प्रशासक तुकाराम मुंढे यांनी पुन्हा एकदा नागरिकांना सावध केले आहे. "बाजारात 200 ते 250 रुपये किलोने मिळणारे पनीर हे खरे पनीर असूच शकत नाही" असे त्यांनी म्हटले आहे.मुंढे यांनी हिशोबच मांडला आपल्या विधानात त्यांनी पनीरच्या उत्पादन खर्चाचा ताळेबंद मांडला. 1 किलो पनीर बनवण्यासाठी 6 ते 7 लिटर दूध लागते. सध्या दूध 60 ते 70 रुपये लिटरने मिळते. त्यामुळे फक्त दुधाच खर्च 400 ते 450 रुपये होतो. याशिवाय प्रोसेसिंग, मजुरी, पॅकिंग, वाहतूक याचा खर्च वेगळा.त्यामुळे 200-250 रुपयात विकले जाणारे पनीर हे दुधापासून बनलेलेच नसून त्यात मोठ्या प्रमाणात भेसळ असण्याची शक्यता आहे, असा दावा मुंढे यांनी केला.त्यांच्या म्हणण्यानुसार अशा स्वस्त पनीरमध्ये दुधाऐवजी पाम ऑईल, स्टार्च, स्किम मिल्क पावडर, डिटर्जंट आणि इतर घातक केमिकल्स मिसळले जाऊ शकतात. असे पनीर खाल्ल्याने आरोग्याला मोठा धोका आहे.
मुंढे यांनी नागरिकांना पनीर घेताना पुढील काळजी घेण्याचे आवाहन केले:
FSSAI मार्क पहा पॅकबंद पनीरवर FSSAI लायसन्स नंबर असणे अनिवार्य आहे.
पाणी टेस्ट करा -पनीरचा तुकडा गरम पाण्यात 10 मिनिटे उकळा. पाणी पांढरे झाले किंवा वर तेलाचा थर आला तर भेसळ आहे.
बिल घ्या - उघड्यावरील आणि बिलाशिवाय मिळणारे पनीर टाळा.


Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |