नागरिकांचा राष्ट्रीय कर्तव्याचा हक्क अबाधित राहण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते सुनील बिडे यांची निस्वार्थ सेवा
भारतीय निवडणूक आयोगाने लोकशाहीच्या पारदर्शकतेसाठी विशेष सखोल मतदार पुनरीक्षण मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत अंबड तहसील निवडणूक विभागाच्या वतीने बीएलओ म्हणून अनिल रोहिदास चव्हाण हे कर्तव्य बजावत आहे.आपल्या कर्तव्यात कसल्याही प्रकारचा कसूर न करता अनिल चव्हाण हे मतदारांच्या घरापर्यंत जात,मतदारांना एसआयआर अर्ज वाटप करत आहे.त्याचबरोबर मतदार राजाला या बाबत योग्य ते व अचूक मार्गदर्शन, सहकार्य करत जनजागृती करत आहे.
विशेष लक्ष विधी व कौतुकास्पद बाब म्हणजे, आपले आद्य कर्तव्य समजून निस्वार्थ भावनेने या राष्ट्रीय कार्यात चांगले नगर स्थित सामाजिक कार्यकर्ते सुनील बिडे हे स्वतः बीएलओ सोबत या राष्ट्रीय कार्यात अत्यंत मोलाचे व महत्त्वपूर्ण कार्य करत आहे. बीएलओ सोबत मतदारांच्या घरी जात अर्ज वाटप करण्यापासून ते अचूकपणे अर्ज भरून घेत नागरिकांना मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य करत आहे. त्याचबरोबर मतदार पुनरीक्षण मोहिमेअंतर्गत मतदारांना या मोहिमेत उस्फूर्तपणे सहकार्य करण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. सर्वसामान्य नागरिक आपल्या राष्ट्रीय हक्कापासून वंचित राहू नये या प्रांजल उद्देशाने सुनील बिडे हे निस्वार्थ कार्य करत आहे. रहिवाशांना देखील त्यांच्या या सहकार्याचा व मार्गदर्शनाचा मोठा फायदा होत आहे. त्यांच्या कौतुकास्पद कामगिरीबद्दल नागरिकांचे वतीने त्यांचे विशेष अभिनंदन व कौतुक केले जात आहे.