रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रलचा पदग्रहण सोहळा १२ जुलै रोजी; नवीन कार्यकारिणीकडून वर्षभर समाजोपयोगी उपक्रमांची रेलचेल

👤 तुषार शिंगाडे सिंधुदुर्ग | 📅 11 July 2026 | 👁 177 Views
रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रलचा पदग्रहण सोहळा १२ जुलै रोजी; नवीन कार्यकारिणीकडून वर्षभर समाजोपयोगी उपक्रमांची रेलचेल


कणकवली : रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रलच्या वर्ष २०२६-२७ या कार्यकाळासाठी नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली असून तिचा पदग्रहण सोहळा रविवार, दि. १२ जुलै रोजी सायंकाळी ६.०० वाजता अलंकार मंगल कार्यालय, कणकवली येथे उत्साहात संपन्न होणार आहे.
या पदग्रहण सोहळ्याला इन्स्टॉलेशन ऑफिसर म्हणून रो. स्वाती हेरकल उपस्थित राहणार असून या रोटरीच्या ज्येष्ठ नेत्या, यशस्वी उद्योजिका आणि वाईच्या पास्ट District Governor आहेत.

नवीन कार्यकारिणीमध्ये रोटेरियन सुप्रिया नलावडे यांची अध्यक्षपदी, रोटेरियन डॉ. अमेय मराठे यांची सचिवपदी, रोटेरियन तृप्ती कांबळे यांची उपाध्यक्षपदी तसेच रोटेरियन डॉ. प्राजक्ता तेली यांची खजिनदारपदी निवड करण्यात आली आहे.


नवीन कार्यकारिणीने समाजहिताला प्राधान्य देत वर्षभर विविध समाजोपयोगी उपक्रमांचे नियोजन केले आहे. पर्यावरण संवर्धनासाठी व्यापक वृक्षारोपण मोहीम राबविण्यात येणार असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत शैक्षणिक मार्गदर्शन व प्रशिक्षण उपक्रम राबविण्याचा मानस आहे. तसेच कणकवली तालुक्यातील अंगणवाडीतील कुपोषित बालकांना कुपोषणमुक्त करण्यासाठी विशेष पोषण अभियान राबविण्यात येणार असून त्यांच्या आरोग्य आणि पोषणाकडे विशेष लक्ष दिले जाणार आहे.

युवकांमध्ये वाढत्या अमली पदार्थ, सिगारेट व इतर व्यसनांच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती करण्यासाठी विशेष व्यसनमुक्ती अभियान आयोजित करण्यात येणार आहे. महिलांना स्वावलंबी बनविण्याच्या उद्देशाने मोफत फायरलेस कुकिंग प्रशिक्षण तसेच पौष्टिक आहारावर आधारित विविध खाद्यपदार्थ तयार करण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

दिव्यांग बांधवांसाठी पांढऱ्या काठ्या, जयपूर फूट तसेच आवश्यक सहाय्यभूत साहित्य उपलब्ध करून देण्याचाही मानस आहे. किशोरवयीन मुलींसाठी “कळी उमलताना” या उपक्रमांतर्गत मासिक पाळी, वैयक्तिक स्वच्छता, आरोग्य आणि मानसिक सक्षमीकरण याविषयी जनजागृती केली जाणार आहे.

याशिवाय नियमित रक्तदान शिबिरे, आरोग्य तपासणी शिबिरे, अवयवदान व नेत्रदान जनजागृती, जलसंवर्धन अभियान, स्वच्छता उपक्रम, करिअर मार्गदर्शन, डिजिटल साक्षरता प्रशिक्षण, विद्यार्थ्यांसाठी व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळा, वाचन संस्कृती संवर्धन तसेच ज्येष्ठ नागरिक सन्मान व आरोग्यविषयक उपक्रमही वर्षभर राबविण्यात येणार आहेत.

“स्वतःपेक्षा सेवेला प्राधान्य” या रोटरीच्या ब्रीदवाक्याला अनुसरून समाजातील प्रत्येक घटकापर्यंत शिक्षण, आरोग्य, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक बांधिलकीची भावना पोहोचविण्यासाठी रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रल विविध नाविन्यपूर्ण व लोकहितकारी उपक्रम राबविणार असल्याची माहिती नूतन कार्यकारिणीने दिली.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
हरिनामाच्या गजरात बाल दिंडीचा सोहळा रंगला मायणी प्राथमिक शाळा मुले व मुली सहभाग | मायणी पक्षी आश्रयास्थानाच्या दुरवस्थेप्रकरणी वनविभागाला आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे निवेदन | ज्येष्ठ नागरिक संघ इंदापूरच्या मासिक बैठकीत ५१ सदस्यांची मोफत आरोग्य तपासणी; वाढदिवसानिमित्त गुणगौरव | राष्ट्रीय कर्तव्यात मुढेवाडीचा डंका! अहोरात्र कष्टातून 'SIR' चे काम आटपाडी तालुक्यात प्रथम पूर्ण | देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न..! | महाराष्ट्राचा 'युथ आयकॉन'! पुण्याच्या रामराजे भोसले यांना राष्ट्रीय स्तरावरील मानाचा पुरस्कार | आषाढी एकादशीनिमित्त टाकेवाडीत आरोग्य शिबिर; ११० नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी | माण-खटाव विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्षपदी अभ्यासू युवा नेतृत्व महेश करचे यांची निवड | विकास सोसायट्यांनी खत विक्रीचे लायसन्स तातडीने काढावीत – प्रकाश सावंत | ४ वर्षांपासून रखडलेले भटवाडी–दिर्बादेवी ११ के वी लाइन चे काम अखेर पूर्ण |