गाबीत समाजाच्या जात प्रमाणपत्र व जात पडताळणीच्या प्रश्नांवर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

👤 तुषार शिंगाडे सिंधुदुर्ग | 📅 11 July 2026 | 👁 213 Views
गाबीत समाजाच्या जात प्रमाणपत्र व जात पडताळणीच्या प्रश्नांवर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
गाबीत समाजातील नागरिकांना जात प्रमाणपत्र व जात पडताळणी प्रक्रियेत येणाऱ्या अडचणींबाबत गाबीत समाजाच्या शिष्टमंडळाने सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी मा. तृप्ती धोंडमिसे यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली तसेच निवेदन सादर केले.

यावेळी गाबीत समाज महासंघाचे अध्यक्ष तथा माजी आमदार परशुराम उपरकर, गाबीत समाज सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर उपरकर, कार्याध्यक्ष हरिश्चंद्र खोबरेकर, मालवण तालुका पदाधिकारी अन्वय प्रभू, सावंतवाडी-दोडामार्ग गाबीत समाजाचे सचिव दीपक तारी आणि उपाध्यक्ष बाबाजी तारी उपस्थित होते.

नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाल्याने विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेसाठी, विविध शासकीय नोकरभरती तसेच व्यावसायिक कर्जासाठी आवश्यक असलेले जात प्रमाणपत्र मिळविताना गाबीत समाजातील नागरिकांना अडचणी येत असल्याचे शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. मालवण व सावंतवाडी येथील सेतू केंद्रांमार्फत तहसीलदार कार्यालयाकडे सादर केलेले अर्ज स्वीकारले जात नसल्याच्या तसेच विविध त्रुटींची कारणे देऊन अर्ज परत पाठविले जात असल्याच्या तक्रारीही यावेळी मांडण्यात आल्या.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |