महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा पुणे यांच्या हिंदी परीक्षांमध्ये शेठ म. ग. हायस्कूल देवगडचे घवघवीत यश.

👤 तुषार शिंगाडे सिंधुदुर्ग | 📅 11 July 2026 | 👁 156 Views
महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा पुणे यांच्या हिंदी परीक्षांमध्ये शेठ म. ग. हायस्कूल देवगडचे घवघवीत यश.
राष्ट्रभाषा हिंदी परीक्षेत घवघवीत यश
महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा पुणे, अंतर्गत हिंदी बालबोधिनी, प्राथमिक, प्रवेशिका तसेच सुबोध या शासकीय परीक्षा माहे फेब्रुवारी २०२६ मध्ये शेठ म. ग. हायस्कूल केंद्रावर घेण्यात आल्या होत्या, या परीक्षेत देवगड हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. सदर परीक्षेमध्ये एकूण ८९ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते, त्यापैकी १४ विद्यार्थी विशेष योग्यता श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले. प्रथम श्रेणीत उत्तीर्ण विद्यार्थी ४५, द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण विद्यार्थी २१ आणि तृतीय श्रेणीत उत्तीर्ण विद्यार्थी ०६ आहेत.
परीक्षेमध्ये यशस्वी झालेले सर्व विद्यार्थी, शिक्षक यांचे प्रशालेचे मा. मुख्याध्यापक श्री प्रवीण खडपकर, पर्यवेक्षिका सौ. दहीबावकर मॅडम तसेच संस्थाचालकांनी अभिनंदन व कौतूक केले.

सदर परीक्षेला प्रविष्ट सर्व विद्यार्थ्यांना प्रशालेतील हिंदी विषय विभाग प्रमुख श्री एस. पी. जंगले, हिंदी विषय शिक्षक श्री आर. ए. बांदिवडेकर, श्री ए. एस. धुर्वे यांनी मार्गदर्शन केले.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |