पिंगळी बुद्रुक येथे सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने 'सहकार सप्ताह' उत्साहात साजरा

👤 आकाश दडस सातारा | 📅 06 July 2026 | 👁 46 Views
पिंगळी बुद्रुक येथे सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने 'सहकार सप्ताह' उत्साहात साजरा


सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने माण तालुक्यातील पिंगळी बुद्रुक येथे 'सहकार सप्ताह' मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे औचित्य साधून उपस्थित शेतकऱ्यांना सद्यस्थितीत वाढणाऱ्या सायबर फसवणुकीच्या संदर्भात सविस्तर व महत्त्वपूर्ण मार्गदर्शन करण्यात आले.


आजकाल डिजिटल बँकिंगचा वापर वाढल्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक होण्याचे प्रमाण वाढले आहे. या पार्श्वभूमीवर, कोणत्याही अनोळखी व्यक्तीला आपला बँक खात्याचा पासवर्ड, ओटीपी किंवा गोपनीय माहिती शेअर करू नये, तसेच संशयास्पद लिंक्सवर क्लिक करू नये, याबाबत बँक अधिकाऱ्यांनी उपस्थित ग्रामस्थांना जागरूक केले.


या कार्यक्रमा प्रसंगी बँकेचे शाखाप्रमुख सुभाष बागल, विकास अधिकारी भवारी साहेब आणि एफएलसी (FLC) समन्वयक सागर पवार प्रामुख्याने उपस्थित होते. त्यांनी शेतकऱ्यांच्या विविध शंकांचे निरसन करून बँकेच्या विविध योजनांची माहितीही दिली. या कार्यक्रमाला पिंगळी बुद्रुक आणि परिसरातील शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना बिस्कीट व प्रसादाचे वाटप | "आषाढी एकादशीच्या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि चंद्रभागा नदीचे भाविकांनी घेतले मनोभावे दर्शन" | सिंधू बँक स्टाफ सोसायटी ची 40 वी वार्षिक सर्वसाधारण सभा पत्रकार भवन, सिंधुदुर्गनगरी ओरोस येथे उत्साहात संपन्न. | टाकेवाडीत आषाढी एकादशीनिमित्त दिंडी सोहळा उत्साहात; विठ्ठल नामाच्या जयघोषाने परिसर दुमदुमला | गोंदवलेत शाळा व दवाखाना परिसर कचरामय; ग्रामस्थांचा संताप | तोरसोळे येथे बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण गोठ्यात घुसून मध्यरात्री केला हल्ला; वन विभागाकडून तातडीने कारवाईची मागणी | मानपाडा-वाघाडी व सोनाळे खुबरोखपाडा अंधारात; १७ दिवसांपासून वीजपुरवठा खंडित, संतप्त ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा | हरिनामाच्या गजरात बाल दिंडीचा सोहळा रंगला मायणी प्राथमिक शाळा मुले व मुली सहभाग | मायणी पक्षी आश्रयास्थानाच्या दुरवस्थेप्रकरणी वनविभागाला आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे निवेदन | ज्येष्ठ नागरिक संघ इंदापूरच्या मासिक बैठकीत ५१ सदस्यांची मोफत आरोग्य तपासणी; वाढदिवसानिमित्त गुणगौरव |