आषाढी एकादशीच्या निमित्ताने श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याकडे माळशिरस तालुक्यातील असंख्य भाविक भक्त दाखल"

👤 पिलीव प्रतिनिधी रघुनाथ देवकर | 📅 06 July 2026 | 👁 84 Views
आषाढी एकादशीच्या निमित्ताने श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याकडे माळशिरस तालुक्यातील असंख्य भाविक भक्त दाखल"
सालाबादप्रमाणे आषाढी यात्रेच्या निमित्ताने श्रीक्षेत्र आळंदी येथून श्री संत ज्ञानेश्वर महाराज व देहू येथून श्री संत तुकाराम महाराज यांच्या दिंडी सोहळ्याच्या प्रस्थानास माळशिरस तालुक्यातील असंख्य भाविक भक्त ज्ञानोबा तुकाराम च्या जयघोषात व जय जय विठ्ठल रखुमाईच्या नामघोषात असंख्य भाविक भक्त दाखल झाल्याचे समजते. आणि त्याप्रमाणे आषाढी वारीची चाहूल सुरू झाल्याचे दिसून येत आहे. त्याचप्रमाणे सर्व मार्गावरील ग्रामपंचायती, नगरपालिका यांचे कडूनही दिंडी सोहळ्याच्या आगमनाची जय्यत तयारी दिसून येत आहे. आरोग्य विभाग, वीज विभाग, सामान्य प्रशासन, महसूल विभाग, पोलीस विभाग, तरुण मंडळे, विविध संस्था यांचे कडून ही जोरात पालखी सोहळ्यांच्या स्वागताची तयारी होत असल्याचे दिसून येत असून जसजशी आषाढी एकादशी जवळ येईल त्याप्रमाणे जागोजागी भक्तिमय वातावरण तयार होऊ लागल्याचे दिसून आलेले आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |