महाराष्ट्र मंत्रिमंडळ विस्ताराची जोरदार चर्चा! सांगली जिल्ह्यातील दोघांची वर्णी लागण्याची शक्यता

👤 राहुल टिबे ईश्वरपूर,सांगली | 📅 06 July 2026 | 👁 431 Views
महाराष्ट्र मंत्रिमंडळ विस्ताराची जोरदार चर्चा! सांगली जिल्ह्यातील दोघांची वर्णी लागण्याची शक्यता
राज्यात लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांमध्ये नवीन चेहऱ्यांना संधी आणि काही जुन्या मंत्र्यांची गच्छंती होण्याची चर्चा आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होऊ शकतात. देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात पाठवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एकनाथ शिंदे यांना "ऑपरेशन टायगर" च्या यशाचे बक्षीस म्हणून मुख्यमंत्री पदाची ऑफर मिळू शकते.राधाकृष्ण विखे पाटील यांचे नाव मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये पुन्हा चर्चेत आहे. पंकजा मुंडे यांना उपमुख्यमंत्री पद दिले जाऊ शकते अशीही चर्चा आहे.ओबीसी आणि पश्चिम महाराष्ट्राला प्रतिनिधित्व ओबीसी चेहरा म्हणून गोपीचंद पडळकर यांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. तर सांगली जिल्ह्यातून सुहास बाबर यांच्या नावाची ही मंत्रिमंडळासाठी चर्चा सुरू आहे. या दोन नावांच्या चर्चांमुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे.दुसरीकडे संजय राठोड आणि नरहरी झिरवाळ यांना मंत्रिपदावरून हटवले जाऊ शकते अशी शक्यता आहे.याबाबत अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. मुख्यमंत्री आणि दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांच्या अंतिम चर्चेनंतरच यादी जाहीर होईल अशी शक्यता आहे . पण सध्या संपूर्ण राज्याचे लक्ष मंत्रिमंडळ विस्ताराकडे लागले आहे.
---
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना बिस्कीट व प्रसादाचे वाटप | "आषाढी एकादशीच्या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि चंद्रभागा नदीचे भाविकांनी घेतले मनोभावे दर्शन" | सिंधू बँक स्टाफ सोसायटी ची 40 वी वार्षिक सर्वसाधारण सभा पत्रकार भवन, सिंधुदुर्गनगरी ओरोस येथे उत्साहात संपन्न. | टाकेवाडीत आषाढी एकादशीनिमित्त दिंडी सोहळा उत्साहात; विठ्ठल नामाच्या जयघोषाने परिसर दुमदुमला | गोंदवलेत शाळा व दवाखाना परिसर कचरामय; ग्रामस्थांचा संताप | तोरसोळे येथे बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण गोठ्यात घुसून मध्यरात्री केला हल्ला; वन विभागाकडून तातडीने कारवाईची मागणी | मानपाडा-वाघाडी व सोनाळे खुबरोखपाडा अंधारात; १७ दिवसांपासून वीजपुरवठा खंडित, संतप्त ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा | हरिनामाच्या गजरात बाल दिंडीचा सोहळा रंगला मायणी प्राथमिक शाळा मुले व मुली सहभाग | मायणी पक्षी आश्रयास्थानाच्या दुरवस्थेप्रकरणी वनविभागाला आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे निवेदन | ज्येष्ठ नागरिक संघ इंदापूरच्या मासिक बैठकीत ५१ सदस्यांची मोफत आरोग्य तपासणी; वाढदिवसानिमित्त गुणगौरव |