सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगची सुविधेबाबत जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांच्याकडून आढावा

👤 अतुल फसाले | 📅 29 June 2026 | 👁 149 Views
सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगची सुविधेबाबत जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांच्याकडून आढावा
फ्लाय 91 व स्टार या विमान कंपन्यांनी सोलापूर विमानतळावरील विमानसेवा सुरळीत ठेवावी
होटगी रोड येथील विमानतळावरून नाईट लँडिंगची सुविधा सुरू करण्याच्या अनुषंगाने येणाऱ्या अडथळ्या बाबत जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी सोलापूर विमानतळ प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून माहिती घेतली. तसेच जिल्ह्यातील नागरिकांनी विमान सेवेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला असून फ्लाई नाईन्टी वन तसेच स्टार या विमान कंपन्यांनी मौसमी पावसाचे कारण सांगून सोलापूर ते मुंबई व सोलापूर ते गोवा ही विमानसेवा बंद ठेवणे व ती सुरळीत राहील याबाबतचा सकारात्मक निर्णय पुढील आठ दिवसात घ्यावा अशा सूचना त्यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागात आयोजित सोलापूर विमानतळावर नाईट लँडिंगची सुविधा सुरू करण्याच्या अनुषंगाने आयोजित आढावा बैठकीत जिल्हाधिकारी कार्तिकेयन मार्गदर्शन करत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील, सोलापूर विमानतळाचे टर्मिनल मॅनेजर माधव संतोष, व्यवस्थापक अंजनी कुमारी शर्मा, प्रांत अधिकारी सदाशिव पडदुने उपस्थित होते. तसेच फ्लाय 91 व स्टार विमान कंपनीचे व्यवस्थापक दूरदृष्य प्रणाली द्वारे बैठकीत सहभागी झालेले होते.
जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी होटगी रोड येथील सोलापूर विमानतळावरून नाईट लँडिंगची सुविधा सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या बाबी तसेच यासाठी अडथळा ठरणाऱ्या अनुषंगिक बाबीवर सविस्तर चर्चा केली. विमानतळाचे टर्मिनल मॅनेजर श्री माधव संतोष यांनी सोलापूर विमानतळावर नाईट लँडिंग सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या तांत्रिक बाबीची सविस्तर माहिती यावेळी दिली.
विमानतळ व्यवस्थापक अंजनी कुमारी शर्मा यांनी विमानतळावर नाईट लँडिंग साठी 140 मीटरचा रणवे आवश्यक असल्याचे सांगितले. तसेच यासाठी लोकोलायझर ही मशिनरी आवश्यक असून त्यासाठी काही अडथळे येत असून सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या एका चिमणीचाही अडथळा निर्माण झालेला आहे. तसेच विमानतळ साठी असलेल्या जागेवर अतिक्रमणे झालेले असून यातील ए विंग मधील अतिक्रमण बाबत सोलापूरच्या सिविल कोर्टनेस ते दिलेला असून बी विंग मधील अतिक्रमणे मोठ्या प्रमाणावर असून या ठिकाणी उच्च न्यायालयाने स्टे दिलेला आहे.
तांत्रिक सुविधा उभारणीचा खर्चDVOR, रनवे लाइटिंग, अप्रोच लाइटिंग, इलेक्ट्रिकल अपग्रेड व बाउंडरी वॉलसाठी सुमारे 30 कोटी रुपये.नवीन टर्मिनल बिल्डिंग, एप्रन व टॅक्सीवे मजबुतीकरणासाठी 100 कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याचेही त्यांनी सांगितले.


*सोलापूर विमानतळावर रात्रीच्या वेळी विमानांची सुरक्षित लँडिंग सुरू करण्यासाठी आवश्यक तांत्रिक सुविधा उभारण्यापूर्वी कायदेशीर व जमीनसंबंधी अडथळे आहेत-
मजरेवाडी सर्व्हे नं. 71 : 57 एकर क्षेत्रात तात्पुरती शेड्स असून मालकी हक्कावरील वाद जिल्हा न्यायालयात प्रलंबित आहे.मजरेवाडी सर्व्हे नं. 73 व 64 : एकूण 39 एकर क्षेत्रात शेकडो घरे असून उच्च न्यायालयाने स्थगिती आदेश दिला आहे. कुमठे सर्व्हे नं. 20, 21A : तीन एकर क्षेत्रात एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया कडे ताबा असला तरी उच्च न्यायालयाने पुढील विकासकामांवर स्थगिती दिली आहे.
जमीन अधिग्रहणाचा प्रश्न- मजरेवाडी व कुमठे गावातील एकूण 50 एकर अतिरिक्त जमीन आवश्यक आहे. जमीन अधिग्रहणासाठी अंदाजे 696 कोटी रुपये (रेडी रेकनर दरानुसार) तर 1069 कोटी रुपये (सेल डीड दरानुसार) खर्च अपेक्षित आहे.

*सोलापूरची विमान सेवा सुरळीतपणे सुरू ठेवावी-
सोलापूर येथून हवाई वाहतूक सेवेला सुरुवात झाल्यापासून जिल्ह्यातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे. तरी फ्लाय 91 व स्टार या प्रवासी वाहतूक करणाऱ्या विमान कंपन्यांनी मोसमी पावसातील दृश्यमानता चे कारण देऊन सोलापूर ते मुंबई व सोलापूर ते गोवा ही प्रवासी हवाई वाहतूक सेवा बंद ठेवण्याचा घेतलेला निर्णय चुकीचा असून या कंपन्यांनी याबाबत विचार करावा व पुढील आठवड्यात या अनुषंगाने निर्णय घ्यावा, अशा सूचना जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी दिल्या.

Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |