सोलापूर जिल्ह्यात रोजगार हमी योजनेतून फळबाग लागवडीला मोठा प्रतिसाद; १२,१७२ लाभार्थी, पंढरपुरात सर्वाधिक तर उत्तर सोलापूर सर्वात मागे

👤 अतुल फसाले | 📅 29 June 2026 | 👁 177 Views
सोलापूर जिल्ह्यात रोजगार हमी योजनेतून फळबाग लागवडीला मोठा प्रतिसाद; १२,१७२ लाभार्थी, पंढरपुरात सर्वाधिक तर उत्तर सोलापूर सर्वात मागे
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने (मनरेगा) अंतर्गत सोलापूर जिल्ह्यात फळबाग लागवड योजनेला शेतकऱ्यांकडून मोठा प्रतिसाद मिळाला आहे. जिल्ह्यातील तब्बल १२,१७२ शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेत आपल्या शेतात फळबागांची लागवड केली आहे. यामध्ये तालुकानिहाय मोठी तफावत दिसून आली असून, पंढरपूर तालुक्याने अव्वल स्थान पटकावले आहे, तर उत्तर सोलापूर तालुक्यात सर्वात कमी लाभार्थ्यांची नोंद झाली आहे.या योजनेमुळे जिल्ह्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला आणि फलोत्पादनाला मोठी चालना मिळत आहे.
योजनेचे प्रमुख फायदे
शाश्वत उत्पन्नाचा स्रोत असून पारंपरिक पिकांना फाटा देत फळबाग लागवडीमुळे शेतकऱ्यांना दीर्घकालीन आणि हमखास उत्पन्न मिळण्याचा मार्ग मिळाला . या योजने अंतर्गत १००% अनुदान आणि मजुरी खड्डे खणणे, झाडे लावणे, खते देणे या कामांसाठी 'मनरेगा' अंतर्गत मजुरी दिली जाते. तसेच रोपे आणि खतांसाठीही अनुदान मिळत असल्याने शेतकऱ्यांचा खिशातील खर्च वाचतो.ग्रामीण भागात स्थानिक पातळीवर मजुरांना मोठ्या प्रमाणावर हक्काचा रोजगार उपलब्ध झाला आहे. जमीन सुधारणा व पर्यावरण पूरक पडीक किंवा कमी सुपीक जमिनीवरही फळबाग लागवड झाल्याने जमिनीचा पोत सुधारण्यास आणि हरितक्षेत्र वाढण्यास मदत होत आहे.
या योजने अंतर्गत तालुकानिहाय असमानता दिसत असून पंढरपूर तालुक्यातून सर्वाधिक मागणी आणि काम झाले असले, तरी उत्तर सोलापूर सारख्या तालुक्यांमध्ये लाभार्थी संख्या अत्यंत कमी असून प्रशासनाला येथे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. सोलापूर हा प्रामुख्याने दुष्काळी जिल्हा असल्याने, लागवड केलेल्या फळबागा उन्हाळ्यात जगवणे हे शेतकऱ्यांसमोर मोठे आव्हान असते. सिंचनाच्या सोयींअभावी काही ठिकाणी रोपे जळण्याचे प्रमाण वाढत आहे .
कृषि विभागात सहाय्यक कृषि अधिकारी यांच्या जागा रिक्त आहेत . एका कृषी सहाय्यक अधिकार्ऱ्याकडे पाच ते सहा गावे दिलेली आहेत . त्यामुळे प्रत्येक शेतकार्यकडे जाणे शक्य होत नाही .
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |