गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस दलाने कठोर पावले उचलावीत.

👤 संतोष एडके तासगाव | 📅 28 June 2026 | 👁 154 Views
गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस दलाने कठोर पावले उचलावीत.

सांगली जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी व नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होईल, अशा पद्धतीने पोलीस प्रशासनाने अधिक सतर्कतेने व प्रभावीपणे काम करावे, असे निर्देश राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे दिले.

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक कक्षात झालेल्या या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, पालकमंत्री महोदयांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवकुमार झाडे आदि उपस्थित होते.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाने अधिक सतर्क राहून संवेदनशील भागांमध्ये गस्त वाढवावी, सीसीटीव्ही यंत्रणांचे जाळे मजबूत करून त्याचा प्रभावी वापर करावा आणि नागरिकांशी समन्वय वाढवून गुन्हे रोखण्यासाठी आवश्यक ती सर्व उपाययोजना कराव्यात, असे त्यांनी सूचित केले.

गुंडाविरोधी पथक स्थापन केल्याबाबत समाधान व्यक्त करून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, पोलीस दलाने विविध अद्ययावत यंत्रणा व उपकरणांची मदत घ्यावी. नियमित शस्त्र तपासणी करावी. गंभीर गुन्ह्यांतील आरोपींना तातडीने अटक करून दोषारोपपत्र वेळेत दाखल करावे, गंभीर गुन्ह्यांतील अटक करण्यात आलेल्या आरोपींचे दोषारोपपत्र प्रक्रिया गतीने करावी. तसेच सराईत गुन्हेगारांवर कठोर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे आदेश त्यांनी यावेळी दिले. शस्त्र परवान्यांचा आढावा घेऊन आवश्यकता असेल तरच शस्त्र परवाने द्यावेत, याचा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला. तसेच, आगामी काळात व्यापक स्तरावर अमली पदार्थ विरोधी पदयात्रा काढण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

बैठकीत जिल्ह्यातील गुन्हेगारीची सद्यस्थिती, गंभीर गुन्ह्यांचा तपास, गुन्हेगारांवरील प्रतिबंधात्मक कारवाई, अमली पदार्थ विरोधी मोहीम, संघटित गुन्हेगारीवर नियंत्रण, महिलांच्या सुरक्षेसाठी राबविण्यात येणारे उपाय, रात्रीची गस्त, संवेदनशील भागांतील पोलीस बंदोबस्त तसेच सोशल मीडियावरील अफवांवर नियंत्रण याचा सविस्तर आढावा घेऊन त्यावर उपाययोजना करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |