"खरसुंडीत धैर्यशील दादा कदम यांचे जल्लोषात स्वागत; सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या भेटीने भाजपमध्ये उत्साह"

👤 आटपाडी | 📅 28 June 2026 | 👁 393 Views
"खरसुंडीत धैर्यशील दादा कदम यांचे जल्लोषात स्वागत; सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या भेटीने भाजपमध्ये उत्साह"


सांगली-सातारा विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार धैर्यशील दादा कदम यांनी खरसुंडी येथे कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्या. त्यांच्या आगमनानिमित्त गावात ठिकठिकाणी उत्साहात स्वागत व सत्कार करण्यात आला.

खरसुंडी येथे भाजपचे सांगली जिल्हा महामंत्री विलासराव काळेबाग, सरपंच धोंडीराम इंगवले तसेच माजी सरपंच अर्जुन पुजारी यांच्या हस्ते आमदार कदम यांचा शाल, फेटा व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

सांगली-सातारा विधान परिषदेचे आमदार म्हणून प्रथमच खरसुंडी येथे भेट देत सर्वसामान्य कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. निष्ठावंत कार्यकर्त्यांनीही समाधान व्यक्त करत आमदार कदम यांचे स्वागत केले.

यानंतर आमदार कदम यांनी श्री सिद्धनाथ मंदिर येथे जाऊन दर्शन घेतले. मंदिर परिसरातही त्यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी आरपीआयचे सांगली जिल्हाध्यक्ष राजेंद्र बापू खरात, ग्रामपंचायत सदस्य किरण पुजारी, विक्रम भिसे, छगन साळुंखे, एकनाथ भोसले, किरण भांगे, तानाजी क्षीरसागर, तानाजी कटरे, संजय कोळेकर, तानाजी पुजारी तसेच बहुसंख्य महिला व भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |