आटपाडीत वाळू माफियांना अभय? मनसेचा प्रशासनावर थेट हल्लाबोल; चौकशी व निलंबनाची मागणी!

👤 आटपाडी प्रतिनिधी | 📅 28 June 2026 | 👁 454 Views
आटपाडीत वाळू माफियांना अभय? मनसेचा प्रशासनावर थेट हल्लाबोल; चौकशी व निलंबनाची मागणी!

आटपाडी तालुक्यात सुरू असलेल्या कथित अवैध वाळू तस्करीच्या प्रकरणाने आता राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना शेतकरी सेनेचे सांगली जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश आबासो गायकवाड यांनी व्हायरल झालेल्या कथित व्हिडिओची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित ग्राममहसूल अधिकारी, कोतवाल व इतर कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांना सविस्तर निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनानुसार, आटपाडी तालुक्यातील विविध नदीपात्रांमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून जेसीबी, ट्रॅक्टर आणि डंपरच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात कथित अवैध वाळू उपसा सुरू असून त्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. रात्रीच्या अंधारात सुरू असलेल्या या प्रकाराकडे संबंधित यंत्रणा दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
व्हायरल व्हिडिओने संशय अधिक गडद
काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका कथित व्हिडिओमध्ये नदीपात्रात जेसीबीद्वारे वाळू भरली जात असल्याचे दिसत असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्याचवेळी महसूल विभागाचे वाहन घटनास्थळी पोहोचल्याचेही दिसत असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, कारवाई करण्याऐवजी वाळू तस्करांना अभय दिले जात असल्याचा संशय या दृश्यांमुळे निर्माण झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
कोतवालाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह
मनसेने व्हिडिओमध्ये कोतवाल गोरख जावीर दिसत असल्याचा दावा करत त्यांच्या भूमिकेची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच वाहनात ग्राममहसूल अधिकारी व इतर कर्मचारी उपस्थित असल्याची शक्यता व्यक्त करत सर्व संबंधितांची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी करण्यात आली आहे.
महसूल बुडतोय, पर्यावरण धोक्यात
अवैध वाळू उपशामुळे शासनाचा महसूल बुडत असून नदीपात्रांचे नैसर्गिक स्वरूप बदलत आहे. भूजल पातळीवरही परिणाम होत असल्याने पर्यावरणीय संतुलन धोक्यात येत असल्याचा आरोप मनसेने केला आहे.
तात्काळ कारवाईची मागणी
प्रकाश गायकवाड यांनी व्हायरल व्हिडिओची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी करून चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना निलंबित करावे, तसेच अवैध उत्खननासाठी वापरण्यात आलेले जेसीबी, ट्रॅक्टर व डंपर जप्त करून संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी केली आहे.
"कारवाई नाही तर तीव्र आंदोलन"
"आटपाडीत सुरू असलेल्या कथित अवैध वाळू तस्करीमुळे शासनाचा महसूल बुडत आहे. व्हायरल व्हिडिओतील बाबींची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई झाली नाही, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना शेतकरी सेना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल," असा इशारा जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश आबासो गायकवाड यांनी दिला आहे.
आता या निवेदनानंतर प्रशासन काय भूमिका घेते, व्हायरल व्हिडिओची चौकशी होते का आणि संशयाच्या भोवऱ्यात सापडलेल्या संबंधितांवर कारवाई होते का, याकडे संपूर्ण आटपाडी तालुक्याचे लक्ष लागले आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना बिस्कीट व प्रसादाचे वाटप | "आषाढी एकादशीच्या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि चंद्रभागा नदीचे भाविकांनी घेतले मनोभावे दर्शन" | सिंधू बँक स्टाफ सोसायटी ची 40 वी वार्षिक सर्वसाधारण सभा पत्रकार भवन, सिंधुदुर्गनगरी ओरोस येथे उत्साहात संपन्न. | टाकेवाडीत आषाढी एकादशीनिमित्त दिंडी सोहळा उत्साहात; विठ्ठल नामाच्या जयघोषाने परिसर दुमदुमला | गोंदवलेत शाळा व दवाखाना परिसर कचरामय; ग्रामस्थांचा संताप | तोरसोळे येथे बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण गोठ्यात घुसून मध्यरात्री केला हल्ला; वन विभागाकडून तातडीने कारवाईची मागणी | मानपाडा-वाघाडी व सोनाळे खुबरोखपाडा अंधारात; १७ दिवसांपासून वीजपुरवठा खंडित, संतप्त ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा | हरिनामाच्या गजरात बाल दिंडीचा सोहळा रंगला मायणी प्राथमिक शाळा मुले व मुली सहभाग | मायणी पक्षी आश्रयास्थानाच्या दुरवस्थेप्रकरणी वनविभागाला आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे निवेदन | ज्येष्ठ नागरिक संघ इंदापूरच्या मासिक बैठकीत ५१ सदस्यांची मोफत आरोग्य तपासणी; वाढदिवसानिमित्त गुणगौरव |